शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेव खूनप्रकरणी संशयित ताब्यात

By admin | Updated: November 22, 2014 00:08 IST

तपशील गोपनीय : इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातून अटक

वाई/मांढरदेव : मांढरदेव येथील प्रसिद्ध काळूबाई मंदिर परिसरात गुरुवारी झालेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. तथापि, तपासाच्या दृष्टीने संशयिताची ओळख आणि तपशील गोपनीय ठेवला आहे.वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाईचे देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरापासून जवळच काल दुपारी एका अल्पवयीन मुलीचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याचे उघड झाले होते. हा नरबळीचा प्रकार असावा का, या शंकेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तातडीने संशयिताचा शोध घेणे पोलिसांच्या दृष्टीने गरजेचे ठरले होते. पोलिसांनी आज, शुक्रवारी एका संशयितास इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातून ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून, भारती कादर भोसले असे खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. संशयिताकडून लवकरच खुनामागील कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. वाई तालुक्यातील सुरूर पोलीस ठाण्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली गेली होती. त्या मुलीचे वर्णन आणि गडावरील खून झालेल्या मुलीचे वर्णन जुळत असल्याने त्या दिशेने शोध घेतला गेला. खून झालेली मुलगी तीच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील हालचालींना वेग आला आणि संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त हॅलो १)नरबळीचा प्रकार नाहीमांढरदेव येथे अल्पवयीन मुलीचा झालेला खून हा नरबळीचा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि, खुनामागील कारणाबाबत आणि संशयिताबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी तपासातील गोपनीयतेच्या कारणाने नकार दिला.