शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ‘गोविंदा’ राजकीय नेत्यांच्या ताब्यात

By admin | Updated: August 12, 2014 23:16 IST

दोन पथकांनी खेळ थांबविला : आयोजकांची संख्या अलीकडे भलतीच घटलीय

जगदीश कोष्टी -सातारा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी गोविंदा पथकांना चांगले दिवस होते. आठ ते दहा मंडळे सक्रीय होती. मोठ-मोठ्या दहीहंडी फोडत असल्याने त्यांचाच बोलबाला सर्वत्र होता. मात्र, जिल्ह्यातील आयोजकांची संख्या अलीकडे घटली आहे. निवडणुका आल्या तर राजकीय नेतेमंडळी दहीहंडी स्पर्धा भरवतात. आजपर्यंत लहान-लहान बक्षिसांवर समाधान मानावे लागत होते.दहिहंडीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेक मुलांनी जीव गमावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदांना केलेला मज्जाव यामुळे गोविंदा पथक सध्या चर्चेत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील आयोजिकांच्या निरूत्साहामुळे अनेक गोविंदा पथकांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. त्यामुळे अनेक नामवंत पथकांनी यापूर्वीच सहभाग घेणे बंद केले आहे.राज्यात कोठेही वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहिहंडी बांधू नये, असे पत्रक राज्य सरकारने काढावे; तसेच १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीतील सहभागावर बंदी घालावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहे. अठरा वर्षांखालील बाल गोविंदांना यापुढे दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. यामुळे संभाव्य अपघात टळून होणारे नुकसान टाळता येणार आहे. मात्र, अठरा वर्षांपुढील गोविंदा घेऊन दहीहंडी खेळायची कशी, असा प्रश्न गोविंदा पथकांसमोर पडला आहे. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. यामध्ये एकावर एक थर लावले जातात. हा खेळ खेळत असताना मनोऱ्यावर पाण्याचा मारा केला जातो. त्यामुळे मनोऱ्यांची रचना करताना खालच्या दोन थरांमध्ये प्रौढ व्यक्ती असतात. त्यानंतर वरच्या थरांसाठी कमी वजनांची मुलं वापरली जातात. सर्वांत उंचीवरचा गोविंदा साधारणत: १० ते १५ किलोचा असतो. १८ वर्षांवरील गोविंदा वापरल्यास हालचाली करण्यास अडचणी येतात.जावळी तालुक्यातील भैरवनाथ गोविंदा पथक, जवळवाडी हे पथक आठ ते दहा वर्षांपासून जिल्ह्यात नावारुपास आले आहे. सातारा, कोरेगाव येथील एक लाखांची दहीहंडी फोडण्याचा मान या मंडळाने मिळविला होता. या मंडळाकडे ८० ते १०० गोविंदा होते. त्यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वीपासून सराव करुन घेतला जात होता. मुलांना चहा-नाष्टा, टी-शर्ट, येण्या-जाण्याचा खर्च वाढत होता. मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा होत नसल्याने खर्चही निघत नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षीपासून हे पथक बंद केले आहे.