शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनी घडविली ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:53 IST

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्ताला पर्याय नाही, त्यातून ‘आरएच निगेटिव्ह’ असेल तर लांब-लांबपर्यंत शोध घ्यावा लागतो. साताºयात मात्र रविवारी ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी अनुभवास मिळाली. जिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांना ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची गरज होती. जिल्ह्यातील रक्तपेढ्यातून काही प्रमाणांत उपलब्ध झाले. पण आणखी बारा बाटल्या हव्या होत्या. व्हॉट्स अ‍ॅप ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रक्ताला पर्याय नाही, त्यातून ‘आरएच निगेटिव्ह’ असेल तर लांब-लांबपर्यंत शोध घ्यावा लागतो. साताºयात मात्र रविवारी ‘निगेटिव्ह’ रक्ताची ‘पॉझिटिव्ह’ कहाणी अनुभवास मिळाली. जिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांना ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची गरज होती. जिल्ह्यातील रक्तपेढ्यातून काही प्रमाणांत उपलब्ध झाले. पण आणखी बारा बाटल्या हव्या होत्या. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आवाहन केले अन् काही तासांत नऊ रक्तदाते धावून आले.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमच युद्धाचा प्रसंग असतो. कधी कोणता रुग्ण दाखल होईल, याचा नेम नाही. रुग्ण दाखल झाला की कर्मचारी, अधिकाºयांची धावपळ सुरू होते. रविवारीही अशीच परिस्थिती उद्भवली.जिल्हा रुग्णालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत चार रुग्ण दाखल झाले. योगायोग म्हणजे सर्वांचेच रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होते. त्यांना रक्त उपलब्ध करून देणे गरजेचे होते. ‘ओ निगेटिव्ह’चे रक्तदाते शंभरात दोन ते तीन आढळतात. त्यामुळे त्यांना ‘अति दुर्मीळ रक्तगट’ म्हणूनही ओळखले जाते.रक्तसुरक्षा विभाग जिल्हा एड्स नियंत्रण विभागाकडून व्यवस्थापन केले जाते. त्यांनी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधून उपलब्ध करून दिले. परंतु या रुग्णांना आगामी काही दिवसांमध्ये रक्त द्यावे लागणार होते. त्यामुळे किमान बारा बाटल्या उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले यांनी यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास रक्तदात्यांच्या गु्रपवर रक्तदानाचे आवाहन केले. याला साताºयातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा मोरया संस्थेचे सदस्यांनी धाव घेऊन रक्तदान केले.सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत नऊ रक्तदात्यांनी धाव घेऊन रक्तदान केले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.ही किमया घडली व्हॉट्स अ‍ॅप समाजमाध्यमामुळे. रक्त सुरक्षा विभागाने सर्व प्रकारच्या रक्तगटनिहाय तसेच सामाजिक संघटनेने ‘आम्ही रक्तदाते’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप केला आहे. रक्ताची कोठे गरज असल्यास या गु्रपवर आवाहन केले जाते. त्यानंतर कोणी ना कोणी सदस्य रक्तदान करण्यासाठी जातो. या ग्रुपवर इतर कोणत्याही प्रकारचे संदेश टाकण्यासाठी मज्जाव आहेत. कोणी चुकून एखादा संदेश टाकला तर इतर मंडळी नियमांची आठवून करुन देतात. त्यामुळे ग्रुपचे चांगले काम सुरू आहे.हजारो रक्तदाते एकत्रजिल्हा रक्त सुरक्षा विभागाने सर्वच रक्तगटांचे स्वतंत्र तसेच काही तरुणांनी ‘आम्ही रक्तदाते’ हादेखील व्हॉट्स अ‍ॅप गु्रप तयार केला आहे. त्यातून हजारो रक्तदाते एकवटले आहेत. या गु्रपवर आवाहन केले की हे तरुण धावून येतात.