शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धनिक दारिद्र्यात अन् गरजू रेषेबाहेर...

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

पाटण तालुका : वंचितांचे हाल

पाटण : तालुक्यात रोजगार निर्मितीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे अनेक कुटुंबप्रमुख व तरुण मुले मुंबई, पुण्यात चाकरमानी आहेत. पाटण तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये शेकडो कुटुंबे कुडामेडीच्या घरात राहतात. परंतु नेमक्या अशा लोकांचाच शासनाच्या दारिद्र्य रेषेखाली समावेश नाही. याउलट शासकीय योजनांचा लाभ व अनुदाने लाटण्यासाठी श्रीमंती व शेकडो एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाचा दारिद्र्यात समावेश केला गेल्यामुळे खरोखर गरिबी भोगणाऱ्यांचे हाल होत आहेत.आजकाल दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबाला शासनाचा मोठा हातभार लाभला आहे. विविध योजना, धान्य, वैद्यकीय उपचार, अनुदाने, कर्ज अशा सुविधा रेषेखाली असणाऱ्यांना मिळत आहेत. मग अशा सुविधांचा लाभ घेणारे धनिक असले तर यांना कशी काय सवलत मिळाली आणि आम्हाला एकवेळच्या जेवणाचा प्रश्न पडत असताना त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यावर समोरून एकच उत्तर येते की तुम्ही दारिद्र्य रेषेत नाही. दारिद्र्य रेषेत कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे याचा अधिकार ग्रामसभेला आहे. मात्र गरजू गरिबांसाठी गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील शेकडो कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी) त्यावेळेस डोळ्यातून अश्रू येतात...एखाद्या कुटुंबातील सदस्य आजाराने त्रस्त झाल्यावर मोठ्या औषधोपचाराची गरज भासते. लाखो रुपयाचे बिल भरायचे कसे असा प्रश्न पडतो. मग दारिद्र्य रेषेत समावेश असेल तर नशिब नाहीतर जमीन, घरदार विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. असे प्रसंग आले आहेत. तालुका समन्वय समितीच्या बैठकीत विषय उपस्थित झाला. त्यादरम्यान नवीन नावे समाविष्ट करण्याबाबत २०१५ मध्ये ८५ दिवसांचा कार्यक्रम झाला. ही बाब उघड झाली. आमदार देसाई यांनी, ‘मलाच याची कल्पना नाही. तर सर्वसामान्य लोकांना कसे कळणार?,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.२०१५ मध्ये दारिद्र्य रेषेबाबत अपील कार्यक्रम राबविण्यात आला होता. ८५ दिवसांच्या या कार्यक्रमात ३५० लोकांनी दारिद्र्य रेषेखाली समावेश करावा, अशी अर्जाद्वारे मागणी केली होती. ज्या लोकांचे अपील नाकारण्यात आले. त्यांना प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.- के. एस. गौतम, गटविकास अधिकारी