शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शिवारातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:44 IST

कऱ्हाड : गत महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले ...

कऱ्हाड : गत महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून शेतक-यांसह ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन महिन्यांनी साखर कारखाने सुरू होणार असून ऊस वाहतुकीवेळी मोठी अडचण होणार आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन ट्रॅक्टर मालकांसह शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींना पाणंद रस्त्यांच्या डागडुजीसाठी त्वरित निधी देणे गरजेचे आहे.

राजमाता गटाने जपली सामाजिक बांधीलकी

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील राजमाता महिला स्वयंसाहाय्यता महिला समूहाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थ तसेच मंडळांच्यावतीनेही जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी, धान्य स्वरूपात मदत देऊ केली आहे. जमलेल्या वस्तू महिला समूहाच्यावतीने स्वखर्चाने टेम्पोद्वारे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी सरपंच सुवर्णा कापूरकर, महिला अध्यक्षा वृषाली कावरे, स्वाती दमामे, दीपाली डोईफोडे, सुजाता गायकवाड, सीमा नावडकर, सविता साळुंखे, शुभांगी वेदपाठक, माधुरी कावरे, पिनू कावरे, बबन घोडके, महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.

येळगावच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

कऱ्हाड : येळगाव, ता. कऱ्हाड येथील पूरग्रस्तांना पंचायत समितीचे सदस्य काशिनाथ कारंडे यांच्यावतीने ब्लँकेट व चटई वाटप करण्यात आले. कहाड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तसेच रयत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समाजातील दानशूर व्यक्तींनी आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी केले. प्रा. धनाजी काटकर, श्यामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बी. एल. पाटील, पंचायत समिती सदस्य काशिनाथ कारंडे, सरपंच शालन मोहिते, उपसरपंच सचिन पाटील, सोसायटीचे अध्यक्ष के. एन. जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रा. राजेंद्र सुतार यांनी मानले.

तुळसण येथे रस्ते काँक्रिटीकरणास प्रारंभ

कऱ्हाड : तुळसण, ता. कऱ्हाड येथील बौद्ध वस्तीअंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण व नाले बांधकामाचा प्रारंभ सरपंच उषादेवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बौद्धवस्तीत लागणा-या गरजेच्या सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी उपसरपंच राजश्री वीर, अ‍ॅड. आत्माराम पाटील, काकासाहेब माने, प्रमोद गावडे, ग्रामसेवक आशिष कांबळे, मुकुंद गावडे, समिर गोतपागर, आनंदा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. काँक्रिटीकरण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. अ‍ॅड. आत्माराम पाटील यांनी स्वागत केले. काकासाहेब माने यांनी आभार मानले.