शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

डाळिंबाचे दर कोसळले; शेतकरी कर्जबाजारी

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

फलटण तालुका : विकत पाणी घेऊन जगविल्या होत्या बागा

नीलेश सोनवलकर --दुधेबावी -दिवाळीपासून डाळिंबांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यात तर विकत पाणी घेऊन बागा जगविल्या होत्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दिवाळीपूर्वी १६० ते १८० रुपये किलो दराने डाळिंब विकले जात होते. परंतु दिवाळीपासून सर्व व्यापारी सणासाठी गावी गेले होते. परिणामी सर्व बाजार ठप्प झाला होता. त्यानंतर चेन्नई (तामिळनाडू) येथे मुसळधार पाऊस झाल्याने तेथे जाणारा माल पूर्णत: थांबला. त्यामुळे डाळिंबाच्या दरावर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला डाळिंबाचे दर पडल्याने सुमारे ३० ते ४० रुपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामध्ये एका कॅरेटमागे ६० रुपये आडत, हमालीचे घेतले जात आहेत. तसेच मालवाहतूक करणारे एका कॅरेटमागे फलटण ते मुंबईसाठी ७० रुपये घेतात. डाळिंबांची प्रतवारी करण्यासाठी कामगार ठेवावे लागतात. त्यांना ४०० रुपये दिवसाची हजेरी द्यावी लागते. तसेच एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब बसतात. त्यामुळे दर पडला तर सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकदम थोडी रक्कम राहत आहे. बाग पोसताना शेतकऱ्यांना औषधाचा व मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दुष्काळी भागात विकत पाणी घेऊन बागांना द्यावे लागत आहे. आता डाळिंबांचे दर पडल्याने व्यापारीही बागांमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बाजार समितीमध्ये अधिकृतरीत्या काम करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन तो मुंबई, पुणे तसेच इतर राज्यात व देशात पाठवितात. तसेच हा माल बाहेर देशात पाठविला की तो एक्स्पोर्ट केला असे म्हणतात. परंतु एक्स्पोर्ट करण्यासाठीची जी फळे असतात ती बागेतील सर्वोत्कृष्ट असतात. त्या फळांचा दरही मोठ्या प्रमाणात असतो. एक्स्पोर्ट होणारा माल हा मोजक्या शेतकऱ्यांकडे असतो.डाळिंबांचे दर पडल्याने शेतकरी संकटात आला असून, काही शेतकऱ्यांचा तर बागेसाठी करण्यात आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डाळिंब बागधारक शेतकरी नाराजीच्या छायेत आहेत.- प्रशांत भीवरकर, धूळदेवडाळिंब पिकासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी फळपीक घेणे बंद करण्याच्या मार्गावर आहेत. - अजित आडके, ग्रामस्थ दुधेबावी