शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी आज मतदान

By admin | Updated: November 18, 2016 23:04 IST

राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे हाय अलर्ट : ३०४ मतदार करणार मतदान

सातारा : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शनिवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे शेखर गोरे तर काँग्रेसतर्फे मोहनराव कदम निवडणुकीसाठी उभे असल्याने दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात हाय अलर्ट ठेवला आहे. वाई तहसील कार्यालय, वाई, महाबळेश्वर, पाचगणी पालिका व लोणंद नगरपंचायतींचे नगराध्यक्ष व सदस्य मतदान करतील. वाई पालिकेचे २० इतके मतदान आहे. महाबळेश्वर पालिकेचे ११ इतके मतदान आहे. पाचगणी पालिकेचे १७ तर नगरपंचायत लोणंद येथे १८ मतदार आहेत. या एकूण ६६ मतदारांना वाई तहसील कार्यालयात मतदान करता येईल. फलटण तहसील कार्यालयात फलटण, म्हसवड या पालिकांच्या सदस्यांना मतदान करता येईल. फलटणचे २८ नगरसेवक, म्हसवडचे १९ नगरसेवक असे एकूण ४७ मतदार मतदान करणार आहेत. सातारा तहसील कार्यालयात जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सभापती असे एकूण ७८ मतदार मतदान करणार आहेत. सातारा नगरपालिकेचे ४३ सदस्य, रहिमतपूर पालिकेचे १९ नगरसेवक असे एकूण १४० मतदार सातारा तहसील कार्यालयात येऊन मतदान करतील. कऱ्हाड तहसील कार्यालयात कऱ्हाड पालिकेचे ३२ सदस्य, मलकापूर नगरपंचायतीचे १९ सदस्य असे एकूण ५१ मतदार मतदान करतील. निवडणुकीसाठी मतदान शनिवार, दि. १९ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चारवाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी महसूल सांस्कृतिक भवन, सर्किट हाउस शेजारी, माधवनगर रोड, सांगली येथे मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होईल, अशीही निवडणूक निर्णय अधिकारी, सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यांनी दिली. (प्रतिनिधी)