शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राजकारणाला धुंद पावसाळी संगीताची भुरळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमायणी : एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाने मराठी माणसाला भुरळ घातलेली असतानाच सातारा जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या शोभना गुदगे यांनी गायलेला ‘पाऊस अंतरी’ नावाचा एक आगळा-वेगळा म्युझिकल अल्बम रविवारी रसिकांच्या भेटीला येत आहे. राजकारणातही कला टिकविता येते, हे जगाला दाखवून दिले आहे.मायणी येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कमायणी : एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाने मराठी माणसाला भुरळ घातलेली असतानाच सातारा जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या शोभना गुदगे यांनी गायलेला ‘पाऊस अंतरी’ नावाचा एक आगळा-वेगळा म्युझिकल अल्बम रविवारी रसिकांच्या भेटीला येत आहे. राजकारणातही कला टिकविता येते, हे जगाला दाखवून दिले आहे.मायणी येथील दिवंगत भाऊसाहेब गुदगे घराण्याच्या स्नुषा आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या पत्नी शोभना यांचा जन्म बेंगलोरमध्ये झाला असला तरी त्या दावणगिरी येथे लहानाच्या मोठ्या झाल्या.कर्नाटकातील संगीताची परंपरा जोपासणारे शहर म्हणून दावणगिरीची वेगळी ओळख आहे.त्यांच्या आई प्रमिला जयराज या शास्त्रीय संगीताच्या चाहत्या आहेत. त्यांच्यामुळे घरात संगीत अन् गायनाचं वातावरण होतं. शोभना या लहानपणापासूनच गाणं म्हणू लागल्या. चौथीत असताना त्यांच्यासाठी शिमोगा येथील पूर्वाचार्य यांना संगीत शिक्षक म्हणून पाचारण करण्यात आले. घरातच संगीताचे शिक्षण सुरू झाले.जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक परीक्षा देत गेल्या. ‘आॅल इंडिया बेंगलोर’वरही गायनाचेसादरीकरण झाले. त्यामुळे कर्नाटकच्या संगीत क्षेत्रात त्यांचे नाव झाले. सुरेंद्र गुदगे यांच्याशी १९९६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या संगीताऐवजी राजकारणात आल्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या.लहानपणापासून कन्नड भाषेत बोलणाºया शोभना यांनी लग्नानंतर प्रथमच मराठी भाषा ऐकली. या भाषेच्या व्याकरणामुळेगोंधळ उडायचा; पण अल्पावधीतच त्यांनी ही भाषा आत्मसात करून आता स्वत:च्या आवाजातील मराठी म्युझिकल अल्बम सादर केलाआहे.भाषा संगीताला अडसर ठरत नाही, हेच या अल्बममधून पुन्हा एकदा सिद्ध होते. त्या आजही मराठी बोलताना अमराठी भाषिक असल्याचे जाणवते; परंतु त्यांचं मराठी गाणं ऐकताना तसे होत नाही.सोबतीला स्वप्नील बांदोडकरांचा आवाज‘टाईमपास १ अन् २’ मराठी चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार चिनार-महेश यांनी गुदगे यांच्या अल्बमला संगीत दिले आहे. त्यांच्यासोबत प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचाही आवाज आहे. ‘पाऊस येताना अनेक रंग घेऊन येतो. मनास मंत्रमुग्ध करतो. तो आपल्या अंर्तमनात प्रेमाचे उधाण आणतो,’ अशा थीमवर आधारित हे गाणे आहे. लवकरच शूरवीर सैनिक व त्यांच्या शूर पत्नी यांच्यावर आधारित दुसरे गाणे अवधूत गुप्ते यांच्यासोबत येत आहे.या व्हिडीओ अल्बममधील दृष्ये क्लासमेट, बसस्टॉप या चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि आॅनलाईन-बिनलाईन फेम ॠतुजा शिंदे यांच्यावर चित्रीत झाली आहेत.माझे सासरे दिवंगत भाऊसाहेब गुदगे हे माझे गायनही ऐकत असत. त्यासाठी आग्रही असत. संगीत हे माझ्या जीवनाचे एक अंग बनले होते. त्यामुळेच पती सुरेंद्र गुदगे यांनी मला गायिका म्हणून प्रेझेंट करायचे ठरविले. अन् माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न सत्यात उतरले. मराठीतील माझे पहिले गाणे ‘पाऊस अंतरी’ रविवार, दि. २० आॅगस्टला रिलीज होत असून, ते मी भाऊसाहेब यांना समर्पित करीत आहे.- शोभना गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्या