शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच राजकीय व्यूहरचना!

By admin | Updated: July 8, 2016 01:06 IST

वडूज नगरपंचायत : अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्राथमिक प्रभाग सर्वेक्षणानंतर वडूज नगरीत संभाव्य प्रभाग रचना आपल्याला कशी फलदायी याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर जाणकार व मुरब्बी नेत्यांकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. सतरा प्रभागांत विखुरलेल्या वडूूज नगरपंचायतीला आता अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे दिग्गज नेतेमंडळींसह युवकांमध्ये या निवडणुकीसंदर्भात नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर शासकीय निधी आणि सर्व नागरी सुविधा तत्पर मिळणार असल्याने वडूजकर या निवडणुकीच्या स्वागताला सज्ज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रभाग रचनेबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळण्यात येत असली तरी राजकारणात माहीर असलेल्या नेते मंडळींसह जुने-जाणकार सदस्यांनी यावर मात करीत सोयीचे राजकारण सुरू केले आहे. सध्या वडूज शहरात नमस्कारामुळे अनेक चमत्कार पाहावयास मिळत असून, मतदार राजाला अवाजवी महत्त्व प्राप्त होताना आढळून येत आहे. ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या बहुतांशी मंडळींनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. सतरा प्रभागांपैकी ९ महिला तर ८ पुरुषांसाठी राखीव असल्यामुळे मी नाहीतर आमच्या अर्धांगिणी आहेतच की? अशा आशयाची प्रचार यंत्रणा सुरू ठेवून काहींनी आघाडी घेतली आहे. (प्रतिनिधी) प्रभाग हजार मतदानाच्या आतच...प्रत्येक प्रभाग हजार मतदानाच्या आत असल्यामुळे नवीनलाही संधी मिळू शकते. यासाठी काही जाणकार व मुरब्बी नेत्यांकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. मात्र या निवडणुकीत साम-दाम-दंड या सर्वांचा वापर होणार असल्या कारणाने आपण कोठे कमी पडता कामा नये यासाठी सर्वपातळीवर इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.