शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा ‘प्रिन्स’ दिसताच बसस्थानक स्तब्ध

By admin | Updated: August 1, 2014 23:21 IST

उंब्रज : बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी

उंब्रज : उंब्रज बसस्थानक... नेहमीप्रमाणेच प्रवाशांची गर्दी... अचानक पोलिसांची गाडी येऊन थांबली... त्यातून पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच बॉम्बशोधक पथकातील श्वान ‘प्रिन्स’ खाली उतरले. बसस्थानकात प्रिन्स काहीतरी शोधत होता, हे पाहून सारेच आवाक् झाले. काही तरी विचित्र घडत असल्याने पाहून बसस्थानक स्तब्ध झाले; पण ही नेहमीप्रमाणे तपासणी झाल्याचे समजल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज बसस्थानक सातारा-कऱ्हाड मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी आहे. याठिकाणी बहुतांश गाड्यांना थांबा असल्याने अनेक प्रवासी या ठिकाणी चहा-अल्पोहारासाठी थांबत असतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्याचप्रमाणे शुक्रवारीही गर्दी होती.सातारा जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथक शुक्रवारी उंब्रज बसस्थानकात धडकले. या पथकाने बसस्थानक, बाजारपेठ परिसरातला भेट देऊन श्वान ‘प्रिन्स’च्या मदतीने परिसराची पाहणी केली. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशामुळे सातारा बॉम्बशोधक व नाशक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हणमंत शिवणकर, मनोहर सुर्वे, महेश पवार, लियाकत पिंजारे, श्वान ‘प्रिन्स’ यांनी पाहणी केली.श्वान ‘प्रिन्स’ व विविध साहित्य घेऊन हे पथक बसस्थानक परिसराचा कोपरान्कोपरा पिंजून काढला. यामुळे अचानक शोधमोहीम सुरू झाल्याची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, काही वेळातच ‘तपासणी सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात यास्वरूपाची तपासणी करणार आहे,’ अशी पोलिसांनी सांगितल्यावर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना बेवारस वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यांना संपर्क साधावा, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करेल. त्यामुळे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शिंदे यांनी केले आहे.