शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार नागरिकांना पोलिसांची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST

खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा ...

खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी खंडाळा शहरात पोलिसांनी धडक मोहीम राबवीत बेजबाबदार नागरिकांना चपराक दिली.

खंडाळा शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे विनामास्क फिरणारे नागरिक तसेच वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलीस प्रशासनाने चेक नाके करून तपासणी सुरू केली आहे. दवाखान्यात जाणारे लोक सोडून इतर कारणास्तव बाहेर पडणाऱ्या लोकांना फिरण्यासाठी अटकाव केला आहे.

खंडाळा शहरात पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक लोकांवर नजर ठेवून विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर अनेक वाहनचालकांची वाहने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे त्यांना चांगलीच चपराक बसली.

भरारी पथकाची

कोरोनाच्या भीषण वास्तवाशी सामना करताना ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. यामध्ये नायगाव, भादे, खेड बुद्रुक, बावडा, पळशी, शिरवळ अशा सहा गणांसाठी प्रत्येकी एक भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. या गणातील प्रत्येक गावात जाऊन विनामास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येत आहे.

खंडाळा शहरासह परिसरातील गावातून लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करीत आहोत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे.

- महेश इंगळे, पोलीस निरीक्षक, खंडाळा

फोटो ०४खंडाळा कारवाई

खंडाळा येथे पोलीस पथकाने चौकाचौकांत कसून चौकशी सुरू केली आहे. (छाया : दशरथ ननावरे)