शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी दिले प्रत्युत्तर; ‘आव्वाज नाय करायचा!’

By admin | Updated: September 19, 2015 23:51 IST

गणेशोत्सवात डॉल्बी : ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई

सातारा : डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर बंदी घातलेली नाही, तसेच त्यांना दिलेल्या नोटीसीचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला असून ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या अटीवर त्यांना उत्सव काळात परवानगी दिली जाईल. मात्र, नियमापेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. डॉल्बी व्यावसायिकांनी शहर पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. मुकुंद सारडा यांना पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यामुळे कायद्याचा भंग व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लाऊड स्पीकर, डीजे डॉल्बी, बेन्जो, म्युझिक सिस्टिम हे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना पुरवू नयेत, या आशयाची नोटीस २८ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, शासन व प्रचलित कायदा व नियम यांच्याद्वारे दिली गेली होती. मात्र कायद्याचे पालन करणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकाला बंदी घातलेली नाही. (प्रतिनिधी) उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जिल्हा डॉल्बी संघटनेच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांना २२ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संघटनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.