नसीर शिकलगार - फलटण शहरालगत असलेल्या व लोकसंख्येने सर्वांत जास्त असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सात महिहन्यांपूर्वी उभारण्यात आलेले कोळकी पोलीस दूरक्षेत्र उद्घाटनानंतर बंदच राहिले आहे. पोलीस चौकी एका दिवसातच बंद पडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.फलटण शहरालगतच कोळकी गाव आहे. जवळपास १० हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. या गावात बँक, पोस्ट, हॉस्पिटल्स, हॉटेल्स आहेत. लोकसंख्या वाढीमुळे अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर या गावातील नागरिकांनी वारंवार मागणी केल्याप्रमाणे येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यात आले.पोलीस दूरक्षेत्रासाठी मोकळी जागाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, बांधकाम होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने शेजारीच पोलीस चौकीसाठी गाळा उपलब्ध करून दिला आणि तेथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली. मात्र, उद्घाटनच्या दुसऱ्या दिवसापासून ही पोलीस चौकी बंद आहे, ती अद्याप उघडली नाही. चौकीबाहेर लावलेला फलकही काढण्यात आला आहे, तर ग्रामपंचायतीबाहेर असलेला फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. चौकी का बंद झाली याचे उत्तर कोणालाही सापडत नसून पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उद्घाटन केलेली पोलीस चौकी एका दिवसातच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते झाले होते उद्घाटनसात महिन्यांपूर्वी प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलीस दूरक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आवश्यक ते पोलीसबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर आमच्यामुळे गावाला पोलीस चौकी मिळाल्याचे दावे करून सत्ताधारी व विरोधकांनी कलगीतुरा रंगविला. मात्र, आता कुणीच काही बोलत नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते झाले होते उद्घाटनसात महिन्यांपूर्वी प्रमुख राजकीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोलीस दूरक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आवश्यक ते पोलीसबळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर आमच्यामुळे गावाला पोलीस चौकी मिळाल्याचे दावे करून सत्ताधारी व विरोधकांनी कलगीतुरा रंगविला. मात्र, आता कुणीच काही बोलत नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.
उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस चौकी बंद
By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST