शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यासमोरील कार्यालय फोडले

By admin | Updated: October 24, 2016 00:34 IST

चितळीनंतर आता लोणंद : ‘कुरिअर’मधील तिजोरीसह सात लाखांची रोकड लंपास

कापडगाव : खटाव तालुक्यातील चितळी येथील जिल्हा बँकेतील दरोड्याची घटना ताजी असतानाच लोणंद पोलिस ठाण्यासमोरच असणाऱ्या कुरिअर कंपनीचे कार्यालय शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. गॅस कटरच्या साहाय्याने शटर तोडून आत प्रवेश करून सात लाख ११ हजार २६ रुपयांची रोकड असणारी तिजोरी घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळ व लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणंद येथे पोलिस ठाण्यासमोर फलटण रोडलगत ब्लू-डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शटरचे सेंटर लॉक व साईडपट्ट्या गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या ठिकाणी कंपनीची दोन दिवसांची रोख रक्कम असलेली व भिंतीला फिट केलेली तिजोरी चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये शुक्रवार, दि. २१ रोजीची १ लाख ६८ हजार ६८० रुपये, शनिवार, दि. २२ रोजीची ३ लाख २ हजार ३४८ रुपये व जेजुरी येथील कार्यालयातील दि. २१ व २२ रोजीचा २ लाख ३९ हजार ९८८ रुपयांचा भरणा असा ७ लाख ११ हजार २६ रुपये होते. बँकेला शनिवारी सुटी असल्याने दोन दिवसांची कॅश कंपनीमध्ये जमा होती. कंपनीचे कर्मचारी सचिन रणवरे हे रविवारी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आल्यावर त्यांना शटर व साईडपट्ट्या तोडल्याचे व शटर दीड फूट वर उचलल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती लोणंद पोलिसांना दिली. सचिन रणवरे हे फलटण, जेजुरी व लोणंद येथे कुरिअरचा व्यवसाय करत असून, दोनच वर्षांपूर्वी त्यांनी लोणंद येथे ही शाखा सुरू केली होती. याची लोणंद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे, हवालदार दत्तात्रय दिघे, अप्पा कोळवडकर तपास करत आहेत. (वार्ताहर) शंभर फुटांवर घुटमळले श्वान... श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान फक्त शंभर फुटांवरच घुटमळले. त्यानंतर दुपारी तीन वाजता ठसेतज्ज्ञांना बोलविले; परंतु त्यांना कोणत्याही ठिकाणी ठसे जाणवले नाहीत. कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा महिन्यापासून बंद असल्याने कोणताही सुगावा लागत नाही. दरम्यान, ‘एवढी रक्कम व वस्तू रात्री ठेवू नका,’ असे लोणंद पोलिसांनी महिन्यापूर्वीच बजावले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठी रक्कम चोरीला गेली.