शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सोबतीला आता माजी सैनिक !

By admin | Updated: February 12, 2017 22:31 IST

विशेष दर्जा मिळणार: जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी माजी सैनिकांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे. या माजी सैनिकांना या काळात विशेष पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात येणार आहे.सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान तर २३ रोजी मतमोजणी होणार आहे. एकावेळी ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात होणार असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. सध्या उपलब्ध असणारे पोलिस बळ कमी पडणार असल्याने या कामासाठी माजी सैनिकांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. जे माजी सैनिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लवकरच आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवावे. याचबरोबर इच्छुक माजी सैनिकांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हा विशेष शाखा येथे संपर्क साधावा.माजी सैनिकांनी आजपर्यंत देशाची सेवा अत्यंत उत्कृष्ठपणे बजावली असून, निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभागही देशसेवेचाच एक भाग आहे. यामुळे माजी सैनिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही निवेदनात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. या संघटनेचे सुमारे १०० च्या आसपास सदस्य या काळात पुन्हा पोलिस बंदोबस्तात सहभागी होणार असल्याची माहिती एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)पोलिस पाटलांनाही आवाहन सातारा तालुक्यातील निवडणूक खासदार आणि आमदार गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. या काळात एखाद्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या इतर घटना आणि घडामोडींची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी शुक्रवारी सातारा तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पोलिस पाटलांनी २३ पर्यंत गाव सोडून इतरत्र न जाण्याच्या सूचना केल्या.