शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्यास पुण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.विश्रृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.विश्रृत नवाते याच्यावर सातारा शहर, शाहूपुरी आणि सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.विश्रृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.विश्रृत नवाते याच्यावर सातारा शहर, शाहूपुरी आणि सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे विविध प्रकारचे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. राजवाडा येथील एका दुकानातून इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करून त्याने बोगस धनादेश दिला होता. या गुन्'ात तो फरारी होता. स्थानिक गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी त्याला या गुन्'ात अटक केली होती. चार दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने पोटात दुखत असल्याचे कारण सांगत जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल झाला. या ठिकाणी काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ९ फेब्रुवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, तरीही त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी गेली नाही.यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याला ११ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत नेण्यात येत होते. यावेळी त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. पुण्यामध्ये नवाते असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक शनिवारी रात्री तेथे दाखल झाले. एका दुकानात इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करण्यासाठी तो आला असता सातारा पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या मदतीने पकडले.दरम्यान, नवाते पळून गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाºयाला निलंबितही केले होते.पळून गेल्यानंतरही पुन्हा तोच प्रयत्न..एखाद्या दुकानामध्ये जाऊन साहित्य खरेदी करायचे. त्यांना बोगस धनादेश देऊन पोबारा करायचा, अशी नवातेची गुन्ह्याची पद्धत होती. पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळून गेल्यानंतरही तो सावज शोधण्याचा प्रयत्न करीत होता. पुण्यातील एका दुकानात साहित्य खरेदीसाठी तो येणार असल्याचे कळताच सातारा पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. पलायनानंतरही त्याचा फसवाफसवीच्या उद्योग सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.