शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: August 2, 2015 00:11 IST

बबलू माने खून प्रकरण : फरार संशयितांचा शोध सुरूच

कऱ्हाड : बबलू मानेच्या खूनप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पाचजणांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना आणखी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, बाबर खान खूनप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे व अक्षय शेंद्रे यांनाही ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शहरातील मंगळवार पेठेत २० जुलैला टोळी युद्धातील पूर्ववैमनस्यातून बबलू ऊर्फ उमेश माने याच्यावर बाबर खान याने गोळ्या झाडल्या होत्या. बबलू मानेची आई अनुसया यांनाही गोळी लागून त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेत बबलू मानेचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून पळून जात असताना बाबर खानला जमावाने दगडाने ठेचून ठार केले. बबलू मानेवरील गोळीबारात संशयित म्हणून बाबर खानचा रायडर फिरोज बशीर कागदी याला व त्यानंतर मोहसिन जमादार, इब्राहिम सय्यद, जावेद शेख व इरफान इनामदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यांना आणखी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या कटात सहभागी असलेला सल्याचा मुलगा असिफ शेख याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अहमदनगर येथे ताब्यात घेऊन अटक केली. त्याला विशिष्ट कारणास्तव १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती करून न्यायालयाच्या परवानगीने त्याला रत्नागिरी येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत. अनेकांचा पोबारा बबलू माने खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपींकडे पोलिसांनी कसून तपास केला आहे. त्यातून आणखी काहीजणांची नावे निष्पन्न झाली असून कारवाईच्या भीतीने काहीजणांनी शहरातूनच पोबारा केल्याची चर्चा आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.