शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या शिक्षकाला पोलिसांनी घरात पकडले

By admin | Updated: July 1, 2017 17:11 IST

बदली केल्याच्या रागाने केली होती मारहाण

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0१ : येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी यांना मारहाण केल्यानंतर रुग्णालयातून पळून गेलेल्या उपशिक्षक महेशकुमार शिंदे यांना शहर पोलिसांनी घरातून मध्यरात्री पकडले.जिल्ह्याबाहेर बदली केल्याच्या राग मनात धरून उपशिक्षक शिंदे यांनी मुख्याध्यापक महामुनी यांच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारला. त्यानंतर स्मृतीचिन्ह आणि इतर साहित्याची तोडफोड केली. वादावादीचा हा प्रकार इतर शिक्षकांना समजल्यानंतर सगळ्यांनी मुख्याध्यापकांच्या दालनात धाव घेतली. त्यावेळी उपशिक्षक महेशकुमार शिंदे यांनी छातीत दुखत असल्याचे इतर शिक्षकांना सांगितले. त्यामुळे वेळ न दवडता शिक्षकांनी महेशकुमार शिंदे यांना तत्काळ शाळेपासून जवळच असलेल्या एका खासगी दवाखान्यात दाखल केले. हा प्रकार शहर पोलिसांना समजल्यानंतर शिंदेला अटक करण्यासाठी पोलिस रुग्णालयात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शिंदे यांनी तेथून धूूम ठोकली. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन शिंदेना अटक केली. परंतु शिंदेंनी पुन्हा माज्या छातीत दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. या ठिकाणाहून पुन्हा पळून जाऊ नये म्हणून दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दुपारी तीनच्या सुमारा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.