शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीमध्ये पोलिसाचे घर फोडले

By admin | Updated: December 26, 2014 00:12 IST

आणखी दोन घरांत चोरी : अकरा हजार रोख लंपास

सावंतवाडी : कलमठ, कणकवली येथे मंगळवारी रात्री चार घरे फोडण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच सावंतवाडी शहरात काल, बुधवारी रात्री तीन बंद घरे फोडण्यात आली. यात एक घर पोलीस कर्मचाऱ्याचे आहे. मात्र, या तिन्ही घरांतून मोठ्या वस्तू चोरीस गेल्याची कोणतीही माहिती पोलिसांना प्राप्त झाली नाही. यातील दोघांनी रात्री उशिरापर्यंत तक्रारच दिली नव्हती.कणकवली येथील कलमठ येथे मंगळवारी चार घरे फोडून ४० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला अवघे २४ तास उलटले नसताना तोच प्रकार सावंतवाडीत घडला आहे. मात्र, चोरट्यांनी सावंतवाडीत बंद घरांना निशाणा केला असून, यातील तिन्ही घरे बंद होती. यात ज्युस्तीननगर भागात असलेले राजेंद्र गजानन सावंत हे आपल्या जुन्या घरी लग्नानिमित्त गेले होते. दोन दिवस त्यांचे नवे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी काल रात्री या घरावर हातसफाई केली. घराची समोरच्या बाजूची कडी काढून घरातील ११ हजारांची रोख रक्कम लंपास केली. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्व सामान विस्कटून टाकले होते. हा प्रकार आज, गुरुवारी राजेंद्र सावंत यांची पत्नी कामानिमित्त नव्या घरी आली तेव्हा लक्षात आला. त्यांनी याबाबतची घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली.तर न्यु खासकिलवाडा भागात राहत असलेले पोलीस हवालदार दीपक दळवी हे काल घर बंद करून वडिलांच्या बाराव्यासाठी गावी गेले होते. त्यांच्या आजूबाजूचा परिसर लोकवस्तीचा आहे, असे असतानाही चोरट्यांनी घराच्या समोरच्या बाजूचे कुलूप काढून आतमध्ये प्रवेश केला व घरातील सामान विस्कटून टाकत पैसे तसेच अन्य सोन्याची वस्तू मिळते काय, याची पाहणी केली. मात्र, त्यांच्या हाताला कोणतीही चीज वस्तू लागली नाही. या घटनेची माहिती दळवी यांना देण्यात आली असून, सायंकाळी उशिरापर्यंत ते सावंतवाडीत दाखल झाले नव्हते. दीपक दळवी सध्या सिंधुदुर्ग जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.सावंतवाडीतील ज्युस्तीननगरमध्ये राहणाऱ्या वैभव चव्हाण यांचे घर नव्याने बांधण्यात आले असून, ते घर गेले काही दिवस बंद होते. त्यांच्या घराचा उद्या, शुक्रवारी गृहप्रवेश होता. यासाठी गुरुवारी घरातील नातेवाईक घर उघडण्यासाठी सावंतवाडी येथे आले असता, त्यांना घराची कडी काढलेली दिसली. तसेच घरातील सामानही विस्कटून टाकण्यात आले आहे. याबाबतची माहिती वैभव चव्हाण यांनी उशिरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. (प्रतिनिधी)पुन्हा चोरट्यांची दहशत गेले काही दिवस सावंतवाडीत चोरीचे सत्र थांबले होते. मात्र, पुन्हा एकदा हे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले की, गोव्याकडे मौजमजेसाठी जाणाऱ्या युवकांचे काम असावे. याबाबतचा तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.