मायणी : वडूज पोलीस अंकित असलेल्या मायणी पोलीस दूरक्षेत्राला कोणी पोलीस कर्मचारी देता का? अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. अपुऱ्या पोलीस बळामुळे सतत या दूरक्षेत्राला कडीच्या आधारावर राहावे लागत आहे. त्यामुळे पोलीस दूरक्षेत्राला कडीचा आधार, असेच म्हणावे लागेल.वडूज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मायणी पोलीस दूरक्षेत्राची स्थापना करण्यात आली. या पोलीस दूरक्षेत्राच्या क्षेत्रामध्ये २२ गावे व ८ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी एक पोलीस अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये सात दिवसांपैकी एक पोलीस कर्मचाऱ्याची एक दिवस साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे ही संख्या सहावर असते.मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या क्षेत्रामध्ये सुमारे चाळीस किलोमीटर राज्यमार्ग असून, यामध्ये सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीचे गाव म्हणून मायणीकडे पाहिले जाते. त्यामुळे या ठिकाणी रोज रात्री नाकाबंदी याच कर्मचाऱ्यांना करावी लागते. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, वाळू तस्करीसारखे उद्योग रात्रीचे मोठ्या प्रमाणात चालू असतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अिशी मागणी जोर धरू लागलेली आहे. (वार्ताहर)आश्वासन हवेत विरलेमायणी पोलीस दूरक्षेत्राचे मायणी पोलीस स्टेशन होणार, यासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते. माजी गृहराज्यमंत्री व गृहमंत्र्यांनी मायणी पोलीस स्टेशन करा, असे आश्वासनही दिले होते; परंतु हे आश्वासन आश्वासनच राहिले, त्यामुळे आजही फाईलही लालफितीत बंद आहे. आज या परिसरामध्ये असणाऱ्या पोलीस वसतिगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली मायणी व परिसरामध्ये घडलेल्या आजपर्यंतच्या गुन्हे किंवा चोऱ्यांचा तपास कधीही लागला नाही.
पोलीस दूरक्षेत्राला ‘कडी’चा आधार!
By admin | Updated: December 28, 2014 22:11 IST