शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खंड्या धाराशिवकरच्या टोळीला पोलिसांनी लावला मोक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 22:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खून, मारामारी, दरोडा आणि खासगी सावकारीचे तब्बल २२ गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय ३५, रा. न्यु विकासनगर खेड, सातारा) याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सर्वसामान्य लोकांना खासगी सावकारीद्वारे दहशत निर्माण करून खंड्याने टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खून, मारामारी, दरोडा आणि खासगी सावकारीचे तब्बल २२ गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय ३५, रा. न्यु विकासनगर खेड, सातारा) याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सर्वसामान्य लोकांना खासगी सावकारीद्वारे दहशत निर्माण करून खंड्याने टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून खंड्याने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पीडित गरजू लोकांना अनाधिकृतपणे व्याजाने पैसे देऊन जबरदस्तीने त्यांची मालमत्ता हडप करत होता. त्याची वाढती दहशत पाहता त्याच्यावर कडक करवाई व्हावी, यासाठी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी खंड्यासह त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी, असा प्रस्ताप पाठविला होता.अधीक्षक संदीप पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता.या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, खंड्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.खंड्याने नागरिकांकडून जबरदस्तीने घेतलेल्या जमिनी, फ्लॅट, दुचाकी आणि चारचाकी वाहने आदी मालमत्तेचीही पोलिस कसून चौकशी करणार आहेत.गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा फाशीसंघटित गुन्हेगारीला मोक्का असे म्हणतात. या खटल्याची सुनावणी पुणे येथील मोक्का न्यायालयात सुरू होणार आहे. मोक्का गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी कारागृहातचअसतात.उच्च न्यायालयामध्ये आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याची संधी असते. मात्र, बहुतांश खटल्यात आरोपींचा जामीन फेटाळला गेला आहे. हा मोक्का गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मेठप किंवा फाशीची शिक्षा कायद्यामध्ये तरतूद आहे.खंड्याच्या टोळीचा तपास उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे करणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील न्यायालयात ते दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.