शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांचं श्रीखंड..घरपट्टीसाठी आदळआपटी

By admin | Updated: February 4, 2016 01:10 IST

पालिका सभा : ‘करंजे’साठी दुसरी समिती नेमण्याचा ठराव एकमताने मंजूर

सातारा : सातारा पालिकेच्या करंजे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ४३ भूखंडधारकांची मुदत संपल्याने हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या सभेत नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या समितीने तीन महिन्यांच्या आत यावर अहवाल सादर करून करंजे येथील भूखंडाचा प्रश्न निकाली काढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, याच भूखंडाबाबत पूर्वी कमिटी स्थापन करण्यात आली होती; परंतु या समितीचा अहवाल काय होता, त्या समितीने काय केले, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये,’ असं म्हटलं तरी हरकत नाही. करंजे भूखंडाबाबत निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. प्रशासनाच्या विरोधात जनतेच्या भावना तीव्र आहेत. भूखंडाबाबत केवळ चर्चा होते; मात्र पुढे काहीच होत नाही. शहराला बकालपणा येत आहे. कुठल्याच कामाचा पाठपुरावा केला जात नाही. केवळ करंजे भूखंडाचा इथे प्रश्न नसून शहरातील सर्व जागांचा अहवाल सादर करावा.’ अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी करंजे भूखंडावर सध्या सुरू असलेला अनागोंदी कारभारच सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, ‘या भूखंडावर सात आरसीसी इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यांनी कोणाचीही परवानगी घेतली नाही. करार केव्हा केला, याची तारीख नाही. करारनाम्यामध्ये विसंगती आहेत. या जागेवर ५० प्लॉट, २३ भाडेकरू आहेत. अशी एकूण ५० हजार ९०० चौरस फूट जागा भाड्याशिवाय आपण देतो. या भूखंडात धीरज झवंर, अशोक झंवर, मोहन इंगवले, सलीम कच्छी, कांतिलाल आग्रवाल यांचा ही समावेश आहे,’ असेही बनकर यांनी सांगितले. नगरसेवक रवींद्र पवार, विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, अविनाश कदम आदींनी भूखंडावर मते मांडली. (प्रतिनिधी)