शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गोकाक पाणीपुरवठा संस्थेत भूखंड घोटाळा

By admin | Updated: March 10, 2016 23:47 IST

पत्रकार परिषद: अशोकराव थोरात व सुधाकर शिंदेंचा आरोप; संस्था राजकीय अड्डा बनली

मलकापूर : गोकाक पाणीपुरवठा संस्था ही राजकारणाचा अड्डा बनली आहे. असा आरोप करत ताळेबंदात तोटा दाखवून संस्थेच्या मालकीची जागा खासगी व्यावसायिकांना भाडेतत्वावर देणे हा बेकायदेशीर ठराव करण्यात आला आहे. संस्थेच्या जागेत होत असलेला पेट्रोलपंप नेमका कोणाच्या मालकीचा आहे. हे कागदोपत्री प्रोसिडिंगच्या ठरावात नाही. मात्र, पंपाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. ही संस्थेच्या सभासदांची दिशाभूल आहे. यावरून नऊ गुंठ्यातील पेट्रोल पंपाच्या जागेचा घोटाळा होत असल्याचा आरोप अशोकराव थोरात व सुधाकर शिंदे यांनी केला आहे.मलकापूर येथील मळाई टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सभासद अंकुश जगदाळे उपस्थित होते.सुधाकर शिंदे म्हणाले, ‘गोकाक संस्थेच्या कामकाजाबाबतची व प्रोसिडिंगची नक्कल मागणीसाठी सहा महिने प्रयत्न केले. मात्र, माहिती देण्यास सचिवासह संचालक मंडळाने टाळाटाळ केली. शेवटी सहकारी उपनिबंधकांकडे दाद मागावी लागली. उपनिबंधकांंनी केलेल्या सूचनेनुसार संस्थेच्या सचिवांनी लेखी स्वरूपात माहिती दिली. ताळेबंद, प्रोसिडिंग व पोटनियमांची नक्कल मागितली असता ताळेबंद व प्रोसिडिंग दिले. दिलेल्या प्रोसिडिंगमधील माहितीनुसार २०११ मध्ये केलेल्या ठरावावरून २०१५-१६ मध्ये जागा देण्याबाबत चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या पेट्रोलपंपाबाबत कंपनीशी केलेला करार अथवा त्याची सत्यप्रत किंवा त्याबांधकामाचे नकाशे, परवाने अस्तित्वात नाहीत किंवा हा पेट्रोलपंप संस्थेच्या मालकीचा की, अन्य कोणा खासगी मालकीचा याबाबतही कोणतेही लेखी दाखले दिलेले नाहीत. यावरून संस्थेच्या नऊ गुंठे जागेचा नेमका एक घोटाळा होण्याची शक्यता आहे. तरी सभासदांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. हे बेकायदेशीर बांधकाम न थांबविल्यास वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू,’ असा इशाराही यावेळी सुधाकर शिंदे यांनी दिला. (प्रतिनिधी)गैरविधाने करून बोळवणसंस्थेच्या कामकाजाबाबत खुलासेवार लेखी माहिती मिळविण्यासाठी आम्ही आॅक्टोबर महिन्यापासून वेळोवेळी लेखी मागणी केली. परंतु संस्थेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. सहा महिन्यांपासून उडवाउडवीची उत्तरे देऊन सातत्याने आमची नुसती बोळवनच केली. शेवटी उपनिबंधक कार्यालयाकडे दाद मागावी लागली. हा सभासदांपासून वस्तूस्थिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोकराव थोरात यांनी केला. ‘संस्थेच्या ताळेबंदानुसार दाखविलेला तोटा २ लाख ७७ हजार ६० रुपये असून, प्रत्येक्ष फेब्रुवारी २०१६ च्या मेरीज पत्रकानुसार संस्था १० लाखाने तोट्यात असल्याचे दर्शवत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. संस्थेच्या हिताची नाही,’ असा आरोप सध्याच्या संचालक मंडळावर गोकाक पाणी पुरवठा संस्थेचे सदस्य अंकुश जगदाळे यांनी केला. कोणत्याही सहकारी संस्थेचा कारभार हा नियमानुसार चालतो. त्यामुळे विरोधकांनी असे काही आरोप केले असतील तर ते तत्थहीन आहेत. त्यांचे आरोप पूर्णपणे समजून घेऊन योग्यवेळी त्यांना योग्य ते उत्तर देऊ.- मनोहर शिंदेसंचालक, गोकाक पाणी पुरवठा संस्था, मलकापूर