शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

किसन वीर कारखान्यात आता प्लास्टिकचे रस्ते

By admin | Updated: November 30, 2015 01:19 IST

टाकाऊ पासून टिकाऊ : प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग

भुर्इंज : ‘प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टंसी (जीएमजीसी) या ‘प्लास्टिक टार रोड’च्या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविलेल्या कंपनीच्या माध्यमातून कारखाना कायस्थळावर प्रायोगिक तत्त्वावर टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून रस्ते बनविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, घनकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व प्लास्टिक रॅपर्सचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरण व स्वच्छतेला घातक ठरणाऱ्या या टाकावू प्लास्टिकपासून रस्ते बनविण्याचे पेटंट पुण्यातील गणेश हिंगमिरे यांच्या जीएमजीसी कंपनीला मिळालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी या कंपनीने केंद्री्रय पर्यावरण मंत्रालयाकडून परवाना मिळविलेला असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टिक टार रोड’ ची शिफारस केलेली आहे.पर्यावरण प्रदूषण व अस्वच्छतेला कारणीभूत ठरणारा प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न हा सर्वांसाठी डोकेदुखीचा व आरोग्याच्या दृष्टीने घातक असून, या प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मर्यादा आहेत. जीएमजीसीच्या तंत्रज्ञानातून प्लास्टिकपासून तयार होणारे रस्ते दीर्घायुषी असून, प्लास्टिकच्या एकदा केलेल्या रस्त्याला किमान पाच वर्षे दुरुस्ती करावी लागणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. या प्लास्टिक रस्त्यांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)पुण्यानंतर जिल्हात प्रथमच उपक्रमजीएमजीसी कंपनीकडून पुण्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रथमच किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर प्लास्टिकचा रस्ता होणार आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्लास्टिक रस्ता वाई, पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांसह सातारा शहराला वरदान ठरणार असून, प्लास्टिक कचरा निर्मूलनाचा प्रश्नही या निमित्ताने निकालात निघेल, अशी आशा मदन भोसले यांनी व्यक्त केली आहे.