शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच्या जन्मादिवशी झाडे लावून जीवनाचेही ‘सार्थक’

By admin | Updated: May 10, 2017 22:44 IST

अनोखा आनंदोत्सव : व्यापाऱ्याने हिकमतीने केले वृक्षांचे संवर्धन

सचिन काकडे ।  -लोकमत न्यूज नेटवर्क --सातारा : घरात नवा ‘पाहुणा’ आल्यानंतर कोणाच्याही आनंदाला पारावर उरत नाही. मग ती मुलगी असो, की मुलगा. नव्या पाहुण्याचा जन्मोत्सव जो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. साताऱ्यात राहणाऱ्या हरिनारायण धोंडिराम कासट यांनीही भावाला मुलगा झाल्यानंतर याचा आनंद आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पुतण्याच्या जन्मादिवशी त्यांनी आपल्या अंगणात बदामाची चार झाडे लावली आणि ती जगवलीही. आज या झाडांना एक तप पूर्ण झालं आहे.वृक्षसंपदेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. मात्र, धावपळीच्या युगात आज कोणालाही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र, सातारा येथील लोखंंडे कॉलनीत राहणारे हरिनारायण कासट याला अपवाद आहे. त्यांनी २४ वर्षांपूर्वी लावलेले नारळाचे झाड व १२ वर्षांपूर्वी लावलेली बदामाची झाडे आज डामडौलात उभी आहेत.बारा वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला मुलगा झाला. घरातील सर्वांनाच याचा मोठा आनंद झाला. मात्र, आपण वेगळ्या पद्धतीने पुतण्याच्या जन्मोत्सव साजरा करायचा असा निर्धार हरिनारायण कासट यांनी केला. त्यानुसार त्यांनी बदामाची चार झाडे आपल्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत लावली आणि त्यांचे संवर्धनही केले. हरिनारायण कासट यांच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांनी, सुना व मुलांनी या झाडांना पाणी घालून त्यांना हिकमतीने जगविले. आज चारपैकी बदामाची तीन झाडे २० फुटाची झाली असून, या झाडांचे आणि कासट कुटुंबाचे आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.२४ वर्षांच्या नारळामुळे परस्परांतील स्नेह वृद्धींगत हरिनारायण कासट यांना झाडे लावणे अन् त्यांचे संवर्धन करण्याची पूर्वीपासूनच आवड आहे. आपल्या घराशेजारी त्यांनी १९९४ मध्ये नारळाचे झाड लावले आणि त्याला वाढवलेलही. नारळाचे झाड आज २४ वर्षांचे झाले आहे. नारळ हे मानाचे फळ आहे. घरात कोणीही आले की त्यांचा पाहुणचार घरातील नारळाने केला जातो. त्यानिमित्ताने परस्परांमधील स्नेह वृध्दींगत होतो असे कासट परिवाराचे म्हणणे आहे.आम्ही मुलगी अथवा मुलगा असा भेदभाव कधीच केला नाही आणि मानतही नाही. घरी दोन मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. पुतण्याच्या जन्मावेळी लावलेली झाडे आज मोठी झाली आहेत. झाडांचे आणि त्याचे वय एकच आहे. आम्ही त्याचे नाव ‘सार्थक’ ठेवले आहे. झाडे लावून ती जगविल्याने आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनाचे ‘सार्थक’ झाल्यासारखे वाटत आहे.- हरिनारायण कासट