शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या भिंतीतून झाडाला पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

०००००००० शुल्क कमीची मागणी सातारा : सातारा जिल्ह्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मुो ऑनलाईन शिकत असली तरी त्यांच्यासाठी संस्थांचा ...

००००००००

शुल्क कमीची मागणी

सातारा : सातारा जिल्ह्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मुो ऑनलाईन शिकत असली तरी त्यांच्यासाठी संस्थांचा फारसा खर्च होत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांनी मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी अनेक पालकांमधून केली जात आहे.

००००

पाकीटमारांवर लक्ष

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात यापूर्वी खिसेकापू, पाकीटमार, महिलांचे दागिने चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस लक्ष ठेवून आहेत. काही अनुचित प्रकार घडताना आढळल्यास, संशयास्पद हालचाली जाणवल्यास संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

००००००

बाकड्यांची सोय

सातारा : साताऱ्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी कुरणेश्वरपर्यंत जातात. यादरम्यान नागरिकांना बसण्यासाठी सोय नसल्याने त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या मार्गात ठिकठिकाणी बागड्यांची सोय करण्यात आली आहे.

०००००

रेंजअभावी गैरसोय

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र जावळी, सातारा, पाटण तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावांत मोबाईल इंटरनेटची रेंजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

००००००

गावोगावच्या यात्रा रद्द

सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. म्हसवडपाठोपाठ अनेक गावांच्या मोठ्या यात्रा असतात. मात्र त्यावर कोरोनाचा परिणाम झालेला जाणवत आहे. त्यामुळे गावोगावच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर आहे.

०००००

नववर्षाच्या नोंदवह्यांना वाढली मागणी

सातारा : जानेवारी महिना सुरू झाला की, नोकरदार, व्यापारी, तरुणाईतून दैनंदिन डायऱ्यांना मागणी वाढत असते. साताऱ्याच्या बाजारपेठेत विविध आकारातील, प्रकारातील डायऱ्या विक्रीस आल्या आहेत. मात्र कोरोनानंतर अनेक उद्योगांना फटका बसला. त्यामुळे डायऱ्यांच्या किमतीही वाढल्याच्या जाणवत आहे. त्यामुळे साध्या डायऱ्या घ्याव्या लागत आहेत.

०००००

वजनात फसगत

सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्डमध्ये दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी बसणारे अनेक व्यापारी, शेतकरी कापडात बांधलेल्या दगडाचा वापर करून वस्तू मोजून देतात. त्यातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे जाणवत आहे. संबंधितांवर कारवाईची गरज आहे.

०००००००

प्रेमीयुगुलांचा उपद्रव

मेढा : जावळी तालुक्यातील काही डोंगरात प्रेमीयुगुले येऊन बसत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

----------

सीसीटीव्ही कॅमेरे गायब

सातारा : साताऱ्यातील अनेक रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र अलीकडे अनेक ठिकाणचे कॅमेरे खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी काढून टाकले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याची मागणी केली जात आहे.

०००००००००

पिकअप्‌ शेडची गरज

सातारा : सातारा जिल्ह्यात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना फाट्यावर जाऊन थांबावे लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी पिकअप्‌ शेडची सोय नसल्याने नागरिकांना ऊन, वारा सहन करत थांबावे लागते.

-००००००००

स्मशानभूमी नावाला

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक गावांच्या स्मशानभूमी नदीकाठी आहेत. दोन वर्षे झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीची शेड वाहून गेली आहेत. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठीही जागा शिल्लक नाही. पर्यायी सोय करावी लागते.

००००००

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक धोक्याची

सातारा : सातारा जिल्ह्यात ऊसतोड पूर्ण क्षमतेने सुरू आहे. बहुतांश साखर कारखान्यांची ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीतून केली जाते. सध्या यंत्रांच्या साहाय्याने ऊस तोड केली जात असल्याने मोळ्या बांधणे बंद झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर थोडा हलला तरी झोका बसत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अशा वाहतुकीवर योग्य ते निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

०००००

रेल्वेस्थानक ओस

सातारा : कोरोनानंतर जिल्ह्यातील रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. मात्र एक्स्प्रेस गाड्यांना अद्यापही जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात शुकशुकाट जाणवत आहे.

०००००

शाळांभोवती गवत

सातारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून बंद आहेत. त्यामुळे तेथे निगा राखण्यासाठी कोणीही उपलब्ध नसतो. त्यामुळे शाळांच्या भोवती मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. ते कापलेले नसल्याने विद्रुप स्वरूप आले आहे.

०००००००

मास्क वापरण्याबाबत निष्काळजीपणा

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची नागरिकांमधील भीती कमी झाल्याचे जाणवत आहे. साताऱ्यातील आठवडा बाजारात अनेक व्यापारी, शेतकरी त्याचप्रमाणे ग्राहकही मास्क नाकाला न लावताच व्यवहार करत आहेत. अनेकांचा मास्क केवळ हनुवटीला लावलेला असतो. मास्क वापराबाबतचा हा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.