शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जागा ६८; उमेदवार साडेचार हजार !

By admin | Updated: March 31, 2016 00:09 IST

पोलिस भरती : पाचशे उमेदवारांची दुसऱ्या दिवशी चाचणी; विविध जिल्ह्यांतून युवक-युवती उपस्थित

सातारा : जिल्हा पोलिस दलात भरतीसाठी दुसऱ्या दिवशी ४९९ उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान, पाच एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीसाठी तब्बल साडेचार हजार उमेदवारांचे अर्ज आले असून, पोलिस शिपायाच्या अवघ्या ६८ जागांमध्ये स्थान मिळविण्यासाठी हे तरुण झुंजत आहेत. पोलिस दलातील भरतीसाठी मंगळवारपासून (दि. २९) भरतीप्रक्रियेस प्रारंभ झाला. बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता प्रक्रिया सुरू झाली. प्रथम कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप घेण्यात आले. एकूण ५५८ उमेदवार बुधवारी हजर राहिले. त्यातील १४ जण कागदपत्र पडताळणीत तर ४५ जण शारीरिक मोजमापात अपात्र ठरले. उर्वरित ४९९ उमेदवारांच्या शंभर मीटर धावणे, लांब उडी, पुल-अप्स, गोळाफेक अशा चार चाचण्या घेण्यात आल्या. या उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी गुरुवारी सोनगाव फाटा ते शेंद्रे फाटा रस्त्यावर घेतली जाणार आहे.दरम्यान, मंगळवारी (दि. २९) झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या ४९१ जणांना १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी बुधवारी बोलाविण्यात आले होते. प्रत्यक्षात ४१८ उमेदवार हजर राहिले, तर ७३ जण अनुपस्थित राहिले. दि. १ रोजी आठशे पुरुष उमेदवारांना पोलिस भरतीसाठी बोलाविण्यात आले आहे. पोलिस शिपायाच्या जिल्ह्यात ६८ जागा भरावयाच्या असून, त्यातील पुरुषांच्या दोन आणि महिलांची एक अशा तीनच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. उर्वरित सर्व जागा आरक्षित आहेत. (प्रतिनिधी)