शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूलाची तस्करी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:07 IST

कºहाड : परदेशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी कºहाडात घेऊन आलेल्या बारामतीच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील स्टेशन रोडलगत कॅफे विहार हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.इंद्रजित माणिक सोनावणे (वय १९, रा. वाघज, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ...

कºहाड : परदेशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी कºहाडात घेऊन आलेल्या बारामतीच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील स्टेशन रोडलगत कॅफे विहार हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.इंद्रजित माणिक सोनावणे (वय १९, रा. वाघज, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एक युवक कºहाडात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विशेष पोलीस पथकातील उपनिरीक्षक शेलार, सहायक फौजदार राजेंद्र राऊत, हवालदार बी. आर. जगदाळे, अरुण दुबळे, संतोष चव्हाण, आसिफ इनामदार, प्रवीण पवार, संदीप पवार, रामदास तुंबडे, इम्रान पटेल, सागर बर्गे, विजय माने, सौरभ कांबळे, रमेश बरकडे, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक स्टेशन रोडवरील कॅफे विहार हॉटेलजवळ पोहोचले. काही वेळात एक युवक त्याठिकाणी आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस पथकाने त्याला हटकले.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इंद्रजित सोनावणे असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे देत त्याने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्याला तत्काळ अटक करून उपअधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. कºहाड शहर पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.