शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जप्त पिस्तुलातूनच झाडल्या गोळ्या

By admin | Updated: August 5, 2014 23:25 IST

संजय पाटील खून खटला : न्यायवैद्यक अधिकाऱ्याची साक्ष

सातारा : आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच गोळ्या झाडण्यात आल्या असून, न्यायवैद्यक चाचणीमध्ये तसे स्पष्ट झाले आहे, अशी साक्ष न्यायवैद्यक अधिकारी राजेंद्र मावळे (रा.पुणे) यांनी दिली.महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याची सुनावणी आज, मंगळवारी जिल्हा न्यायालयात झाली. न्यायवैद्यक अधिकारी मावळे म्हणाले, ‘मृताचे रक्त, रक्त पडलेली माती, अंगावरील शर्ट, घटनास्थळी सापडलेल्या ११ पुंगळ्या, एक जिवंत काडतूस, मृताच्या शरीरातून काढलेल्या तीन पुंगळ्या याची न्यायवैद्यक चाचणी घेण्यात आली. या सर्व वस्तू एकमेकांशी जुळून आल्या. नऊ एमएमटू पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या की नाही, हे तपासले असता त्यातून फायर झालेले होते, असे निष्पन्न झाले. पिस्तूल लपविलेल्या ठिकाणाची माती, पिस्तुलावर असणारी माती त्याच ठिकाणची आहे, असे तपासणीत निष्पन्न झाले.’यावेळी न्यायवैद्यक अधिकारी अमोल पवार, एन. एस. येवले, ए. एस. बडदे यांचीही साक्ष झाली. दरम्यान, तत्कालीन पोलीस निरीक्षक व या खटल्यातील आरोपी आणि तपासी अधिकारी संभाजी पाटील यांची आज साक्ष होणार होती. मात्र, मुदत मिळावी, असा अर्ज त्यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आला. मागच्या सुनावणीवेळी फितुर घोषित केल्यामुळे संभाजी पाटील यांनी उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्या अर्जावर दि. १३ ला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचे खटल्याचे कामकाज तहकूब करून पुढील सुनावणी दि. २१ ला होणार असल्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)