शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंजरा वाघवस्तीत अन् बिबट्या अंदोरीत!

By admin | Updated: July 27, 2016 00:27 IST

वनकर्मचाऱ्यांना चकवा : अचानक समोर आल्याने अंगणवाडी शिक्षिका भयभीत

खंडाळा : अंदोरीसह भादे, वाठार परिसरात आठ दिवस ठिकठिकाणी दिसणाऱ्या बिबट्याने वनविभागाची पळता भुई थोडी केली आहे. वाठार येथील वाघवस्तीच्या शिवारात पिंजरा लावून वनकर्मचारी दोन दिवसांपासून वाट पाहत असतानाच त्यांना बिबट्याने चकवा दिला. अंदोरी येथील कांचनवस्ती ते देवस्थान जमिनीच्या शिवारात मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले. बिबट्याला पाहिल्यामुळे अंगणवाडी शिक्षिका यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना उपचारासाठी लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथील रुई शिवारात रविवार, दि. १७ रोजी बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी भादे येथील होडी शिवारात तर वाठार येथील वाघवस्ती शिवारात बिबट्या त्याच्या बछड्यासह दिसला होता. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याने त्याला पकडण्याची मागणी होत होती. नागपूर येथील वन्यजीव संरक्षण विभागाच्या परवानगीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पिंजराही लावला. दोन दिवस दक्षता घेऊनही बिबट्या हाती लागला नाही. एकंदर परिस्थिती पाहता बिबट्या नदी पलीकडे पसार झाला की काय, अशी चर्चा सुरू असतानाच अचानक अंदोरी भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. रुई येथे अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या सुरेखा कराडे या सकाळी अकराच्या सुमारास रुईला चालत जात असताना समोरून अचानक बिबट्या दिसला. यामुळे कराडे या घाबरल्या असून, त्यांना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच वनरक्षक एम. के. करपे आणि पी. एम. गाढवे यांनी तातडीने कांचनवस्ती भागात जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांना दिसला नाही. तरीही वन अधिकारी या परिसरात तळ ठोकून आहेत. अंदोरी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्या दिसल्या ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)