शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डेपोतील कचऱ्याचे चक्क रस्त्यावरच ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST

सातारा : सातारा नगरपालिकेचा सोनगाव येथील कचरा डेपो सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. डेपोतील कचऱ्याचे ढीग संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्यावर ...

सातारा : सातारा नगरपालिकेचा सोनगाव येथील कचरा डेपो सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. डेपोतील कचऱ्याचे ढीग संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्यावर साचू लागल्याने याचा वाहनधारक व स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनगावसह परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा डेपोमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या डेपोतून निघणारा धूर व समस्यांमुळे सोनगाव व जकातवाडी ग्रामस्थांनी आजवर अनेक आंदोलने केली. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने डेपोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, तरीही ग्रामस्थांच्या समस्या मात्र आजही कायम आहेत.

सातारा शहरासह हद्दवाढीतील कचरा पालिकेकडून संकलित केला जातो. हा कचरा सोनगाव डेपोत टाकला जातो. गेल्या काही दिवसांपासून डेपोत कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग साचू लागले असून, हा कचरा आता संरक्षक भिंत ओलांडून रस्त्यावर येऊ लागला आहे. या कचऱ्यातील प्लास्टिक व इतर वस्तू रस्त्यावर इतरत्र पसरत असून, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सातारा पालिकेने तातडीने या परिसराची स्वच्छता करावी, अन्यथा सोनगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारतील, असा इशारा सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

(कोट)

कचरा डेपोचा स्थानिक नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. कचरा डेपोत घनकचरा निर्मूलनाचा मोठा प्रकल्प उभारूनसुद्धा समस्या सुटलेल्या नाहीत. आता तर कचरा डेपोच्या बाहेर रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेने स्वच्छता न केल्यास सोनगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारतील व होणाऱ्या परिणामांना पालिकाच जबाबदार असेल.

- महेश बाबर, सोनगाव ग्रामस्थ

फोटो : १५ सोनगाव कचरा डेपो

सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोच्या बाहेर अशा प्रकारचे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. (छाया : सागर नावडकर)