शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पिकपाॅकीटमार टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरच्या दोन महिलांना अटक; ५० तोळ्यांचे दागिने हस्तगत

By दत्ता यादव | Updated: January 31, 2024 21:58 IST

तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकात पिकपाॅकीट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, यामध्ये एका सराफासह दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

रूपाली अर्जुन सकट (वय ३०), गीता संदीप भोसले (दोघीही रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), सराफ रफिक अजिज शेख (४०, रा. सांगली), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा बसस्थानकातून सातत्याने महिलांच्या गळ्यातील तसेच पर्समधील दागिने चोरीस जात होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून बसस्थानकात साध्या वेशात पाळतीवर ठेवण्यात आले. विशेषतः संशयास्पद महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. त्यातील दोन महिलांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. रूपाली सकट व गीता भोसले या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर सातारा बसस्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी पिकपाॅकीटमारी केल्याची कबुली दिली.

 बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करून ते सांगलीतील सराफाकडे विकले जात होते, अशी माहिती या दोन्ही महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी सांगलीतून रफिक शेख या सराफाला अटक केली. या महिलांनी विकलेले ३२ लाखांचे सोने त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. या महिलांच्या साेबतीला आणखी तीन संशयित असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र बोरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, महिला पोलिस दीपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दीपाली गुरव, पंकजा जाधव आदींनी ही कारवाई केली. 

केवळ सातारा जिल्ह्यातच चोरी..

या महिलांनी सातारा शहर, वडूज, फलटण शहर, कऱ्हाड शहर, दहिवडी, कोरेगाव, या बसस्थानकांत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली. यापूर्वी या टोळीवर कुठेही गुन्हे दाखल नाहीत. पहिल्यांदाच ही टोळी उघडकीस आली आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच ही टोळी चोरी करत होती.

चोरीसाठी कारचा वापर

या महिला चोरी करण्यासाठी कारने साताऱ्यात यायच्या. एक मंगळसूत्र चोरी केल्यानंतर तातडीने त्या पुन्हा कारमधून कोल्हापूरला निघून जायच्या. पोलिसांनी त्यांच्यावर वाॅच ठेवून ही चोरी काैशल्याने उघडकीस आणली.