आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २४ : घरात अचानक तोल गेल्याने पडून गंभीर जखमी झालेल्या अभिजित भगवान चांगण (वय ३५, रा. शुक्रवार पेठ, फलटण) या युवकाचा रुग्णालयात नेत असतान वाटेतच मृत्यू झाला.याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिजित हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला अशक्तपणा होता. घरात उभा राहिला असताना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला घरातल्यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
तोल जाऊन पडल्याने फलटणच्या युवकाचा मृत्यू
By admin | Updated: June 24, 2017 17:04 IST