शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फलटणकरांची १०५ वर्षांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: June 12, 2017 01:15 IST

फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन; तालुक्यामध्ये आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : कऱ्हाड येथे केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे वीडियो कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन करण्यात आल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. लोणंद-फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व्हावा ही फलटणकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी लोकसभेत खासदार असताना माजी हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी वारंवार रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतरही वारंवार पाठपुरावा केल्याने आज लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे कामही सुरू झाले आहे. साधारण १९१२ साली ब्रिटिशांनी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग करण्याचे निश्चित करून १९१८ मध्ये आराखडा तयार करण्यात आला. १९२६ साली रेल्वे मार्गासाठी ३२७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात हा मार्ग रखडला गेला. हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्यासह माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभूू यांनी हिरवा कंदील दिल्याने फलटण-पंढरपूर या १०५ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाला मंजूरीसह १ हजार १५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. फलटण ते पंढरपुर रेल्वे मार्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुरेश प्रभूंच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाल्याने फलटणकरांची रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.