फलटण : फलटण पंचायत समितीच्या आवारातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेल्या गटसाधन केंद्राच्या परिसरात दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून येत असल्याने शासकीय कार्यालयाचा हा परिसर तळीरामांचा अड्डा बनला असल्याचे चित्र समोर येत आहे. या तळीरामांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या ठिकाणी येणाऱ्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यक्तींमधून होत आहे.
तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासंबंधीचे कामकाज याच ठिकाणी असलेल्या कार्यालयामधून चालत असते. त्यामुळे या ठिकाणी अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा सुरू असते. शिवाय या कार्यालयाच्या शेजारीच कोरोना तपासणी केंद्र असून येथेही सर्व वयोगटातील व्यक्तींची गर्दी असते. नगरपालिका शाळांचे कार्यालयही याच आवारात असून, मद्यपींकडून या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या बाटल्या, ग्लास याचा नाहक त्रास या कार्यालयात ये-जा करणाऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांचा शोध घेऊन त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो आहे.
फलटण येथील शासकीय कार्यालयाचा हा परिसर तळीरामांचा अड्डा बनला आहे.