शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फलटण शहरातील कुत्र्यांवर ‘संक्रांत’!

By admin | Updated: January 16, 2016 00:30 IST

विषारी पदार्थ खाऊ घातले : चार दिवसांत १५ मृत्युमुखी; संबंधितांवर कारवाईची मागणी

नसीर शिकलगार -- फलटण शहरातील कुत्र्यांवर कोणीतरी अज्ञातांनी वक्रदृष्टी फिरवली आहे. त्यांना विषारी पदार्थ खायला घातल्याने अनेक ठिकाणी भटकी व पाळीव कुत्री मृतावस्थेत आढळून येत आहेत. कुत्र्यांवर संक्रांत आणणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक व प्राणीमित्र संघटनांकडून होत आहे. दरम्यान, चार दिवसांत १५ हून अधिक कुत्री मृत्युमुखी पडली आहेत.फलटण शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या जनावरांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये कुत्री, डुकरे, गाढवे, गाई यांचा समावेश आहे. मोकाट जनावरांचा सामान्य जनतेला त्रास होत असतोच; मात्र या मोकाट जनावरांवर अंकुश लावण्याचे काम नगरपालिकेचे आहे. मोकाट जनावरांविषयी अनेक तक्रारी नगरपालिकेकडे करूनही ते दखल घेताना कधी दिसले नाही. शहरात भटक्या कुत्र्यांबरोबरच पाळीव कुत्र्यांचीही मोठी संख्या आहे.यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे मध्यंतरी अनेकांना उपचार घ्यावे लागले होते. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. कुत्री पकडून इतरत्र सोडणे किंवा कुत्र्यांची नसबंदी असे अनेक प्रकार आहेत. मात्र, सध्या शहरात दिसेल त्या कुत्र्यांना मारण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहे. दिसले कुत्रे की त्याला विषारी औषध असलेले अन्नपदार्थ खायला द्यायचे. हे विषारी औषध खाल्ल्यावर मृत्यू पावल्याचे अनेक उदाहरणे तीन-चार दिवसांत घडली आहेत.यामध्ये पाळीव कुत्र्यांबरोबरच लहान-लहान कुत्रीही मृत पावल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत १५ हून अधिक कुत्री मृत्युमुखी पडली असून, या संदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे चौकशी केली असता मोकाट जनावरांसंदर्भात कोणतीच मोहीम सुरू नसल्याचे सांगण्यात आले. कुत्र्यांना मारण्याच्या प्रकारामागे कोण विकृत आहे. याचा शोध घ्यावा. मारणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. यासंदर्भात संबंधितांकडे तक्रारी करण्यात येणार आहेत. नगरपालिकेचा संबंध नाही फलटण शहरात कुत्र्यांना मारण्याचे जे प्रकार सुरू आहेत, त्याच्याशी नगरपालिकेचा कोणताही संबंध नाही. नगरपालिकेकडून मोकाट जनावरांसंदर्भात कोणतीच कारवाई सध्या सुरू नाही. मृत पडलेली कुत्री फक्त नगरपालिकेचे कर्मचारी उचलून नेत आहेत.- यशवंत डांगे, मुख्याधिकारीकुत्र्यांना मारणाऱ्यांचा शोध घ्यावा कोणीतरी अज्ञातांनी दृष्टवृत्तीने लहान-मोठी कुत्री मारून माणुसकीला काळिमा फासला आहे. जो कोणी कुत्र्याला मारीत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. या संदर्भात मी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तक्रार घेतली नाही. या प्रकाराबाबत विविध सामाजिक व प्राणीमित्र संघटनाकडे तक्रार करणार आहे.- शिवाजी भोई, सामाजिक कार्यकर्ते