शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये ‘नृत्य अविष्कार’ला

By admin | Updated: December 30, 2014 23:27 IST

सखींकडून उत्स्फूर्त दाद

फलटण : येथील लोकमत सखी मंचच्यावतीने ‘नृत्यअविष्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन फलटण येथील सांस्कृतिक भवन, फलटण येथे केले होते. अजिंक्य कला निकेतन ग्रुप निर्मित नृत्यअविष्कार कार्यक्रमाला सखींनी टाळ्या, शिट्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी लोककलेचा आगळा-वेगळा अविष्कार असलेल्या या नृत्य अविष्कार कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन फलटण येथील सर्व सखीमंच कार्यकारिणी सदस्या यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये लोप पावत चाललेल्या मराठी लोककलेचे दर्शन सर्व सखींना झाले. अजिंक्य कला निकेतन ग्रुपने सादर केलेल्या दिंडी डान्सच्या माध्यमातून सर्व सखींनी पंढरीच्या विठ्ठल दिंडीचे दर्शन घेत टाळ्यांचा पाऊस पाडला.वासुदेव गीताने जुन्या पहाटेची आठवण करून दिली. याचबरोबर कोळी नृत्य आणि कोळी समाजातील लग्नसोहळाही सादर करण्यात आला. त्यामध्ये सखींनी डान्सची साथ घेऊन लग्नसोहळ्यातील आपली उपस्थिती दर्शविली. धनगरी नृत्यामध्ये अजिंक्य लकडे यांनी अप्रतिम डान्स करून सर्वांची मने जिंकली. गोंधळ नृत्याच्या माध्यमातून सर्व सखी देवीची आराधना करण्यात गुंग झाल्या.अशुतोष किर्तीकर याने सादर केलेल्या सोलो लावणीला सखींनी चांगला प्रतिसाद दिला. अन्य कलाकारांनी सादर केलेल्या आयटम साँगनेही धम्माल उडवून दिली.स्रेहल रोकडे आणि आमृता कांबळे यांनी सादर केलेल्या ‘ही पोळी साजून तुपातली’ या गाण्यावर सखींनीही स्टेजवर जाऊन धम्माल उडवून देत डान्सचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात अजिंक्य लकडे, केतन देशमुख, अभिजित वाघ, विशाल बेंद्रे, गोपाळ रावखंडे, काजल रोकडे, स्रेहल रोकडे, स्रेहल शिंदे, आमृता कांबळे, पूजा चव्हाण, निकिता कांबळे, अशुतोष किर्तीकर, निकिता कांबळे, स्रेहा काकडे या सर्व कलाकारांनी आपली कला सादर केली. लोकनृत्याची उपासना हिच आमची जोपासना असे ब्रीद वाक्य असणाऱ्या अजिंक्य कला निकेतन ग्रुपने लोककलेचा आगळा-वेगळा नृत्यअविष्कार सादर केला. (प्रतिनिधी)या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजकत्व फलटण येथील प्रसिध्द जोशी हॉस्पिटल यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमामध्ये चंदूकाका सराफ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या प्रज्ञा प्रवीण शहा या मानकरी ठरल्या. यावेळी सखी ब्युटी पार्लरतर्फे फेशियलचा लकी ड्रॉ डाढण्यात आला.