शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फलटणची स्मशानभूमी पडू लागली अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:37 IST

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर ...

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्याजवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे, तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

फलटण शहरात व तालुक्‍यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही साधारणपणे २० एवढी आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर फलटण नगरपरिषदेचे कर्मचारी हे अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यामुळे फलटण नगरपरिषदेच्या अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी फलटण नागरपालिकने अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी व या ठरावास तातडीने प्रशासकीय मंजुरीही देण्यात यावी, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी यांचे वेळ खूप जात आहे. फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव तातडीने घ्यावा व त्या संबंधित पावले नगरपालिकेने तातडीने उचलावीत, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.