शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:57 IST

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड ...

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड येथे यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे विवेक कांबळे, हणमंतराव साठे, प्राचार्य शहाजी कांबळे, अशोकराव मदने, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जयवंत विरकायदे, किशोर तपासे, कºहाड तालुकाध्यक्ष युवराज काटरे, राजू गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘‘भाजप जातीयवादी असल्याचं बोललं जातंय. नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याबद्दल चांगलं बोलताहेत. संविधान बदलणार नाही. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे ओरडून सांगताहेत. मात्र, काही विरोधी पक्षातील लोक भाजपवाले असे करतील तसेच करतील, असे सांगत आहेत. आरपीआय हा मोठा पक्ष आहे. या पक्षात हिंदू, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांतील लोक आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी भांडत न बसता एकत्रित राहिले पाहिजे. आरपीआयची ताकद वाढविली पाहिजे. आरपीआय हा संभाजी भिडे यांच्या बाजूने नाही. संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. डॉ. बाबासाहेबांनी जोडण्याची भूमिका सांगितली आहे, तोडण्याची नाही. खरे मित्र बनवणे हीच खरी आपली चळवळ आहे.’मेळाव्यापूर्वी राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कºहाड तालुका आरपीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यानंतर राज्यमंत्री आठवले यांनी कºहाड येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात गोळामाझ्या मंत्रिपदाकडे लागला आहे डोळा... कारण मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात उठलाय गोळा... जर खराच असशील तू भीमाच्या बाळा... तर लाव ना तू जातीयवादी लोकांच्या तोंडाच्या काळा... अशा मार्मिक कवितेच्या माध्यमातून नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.