शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी हॉटेलची, काढला बिअरबार

By admin | Updated: January 28, 2015 00:58 IST

पाचवड ग्रामसभा वादळी : ग्रामपंचायतीने परवानगीच दिली नसल्याचा सरपंच, ग्रामसेवकांचा दावा

भुर्इंज : वाई तालुक्यातील पाचवड येथे विनापरवाना ‘बिअरबार’वरुन ग्रामसभेत रणकंदन झाले. ‘या बारसाठी अर्थपूर्ण तडजोडी झाल्याचा’ आरोप काही ग्रामस्थांनी केला. मात्र, ‘या बारसाठी ग्रामपंचायतीने कोणतीही परवागी दिली नाही,’ असा दावा सरपंच, ग्रामसेवकांनी केला. बिअरबारबरोबर अनेक कारणांवरुन ही ग्रामसभा गाजली असून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले आहेत.पाचवड व उडतरे गावच्या दरम्यान बिअरबार सुरू झाला आहे. या ठिकाणी २०१३ मध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी ग्रामपंचायतीने दिली. तसेच हे बांधकाम बिगरशेती जागेत असूनही त्या बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. मात्र, हॉटेल मालकाने ‘बिअरबार’ सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली नव्हती. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता, याबाबत ग्रामसभेत कोणताही ठराव न होता बार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हा बार बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबतची कागदपत्रेही ग्रामसभेपुढे मांडण्यात आली. ‘पाचवड गावात ‘शॉप अ‍ॅक्ट’ लागू होत नाही,’ असा दाखला ग्रामसेवकाने दिला. त्यामुळे बारला थेट परवानगी मिळाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, अजित शेवाळे यांनी केला. त्यावर ग्रामसेवक सुरेश बाबर म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असताना राज्य उत्पादन शुल्कचे वाई येथील दुय्यम निरीक्षकांनी २० नोव्हेंबर, २०१३ रोजी सायंकाळी घरी येऊन याबाबत आपला जवाब घेतला. वास्तविक त्यावेळी त्यांना कार्यालयात येऊन जबाब घ्या, असे सांगितले. पण, अधिकाऱ्यांनी ‘आम्हाला शिकवू नका, मी तुमच्या वरचा अधिकारी आहे,’ असे सांगून जबरदस्तीने जबाब नोंदविला. शॉप अ‍ॅक्ट लागू होत नाही, असा जबाब दिला आहे, याबाबत मी स्वत: कुठला दाखला दिला नाही.’‘संबंधित बारला परवानगी दिली नाही, उलट तो बार बेकायदा असून बंद करावा, अशीच विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे,’ अशी माहिती सरपंच संजय गायकवाड, सदस्य भरत गायकवाड, महेश गायकवाड यांनी मांडली. विद्यमान पदाधिकारी राजकारण बाजूला ठेवून विकास करत आहेत. गावापेक्षा कोणी मोठा नाही. गावात दारूबंदी झालीच पाहिजे,’ अशी मागणी शामराव गायकवाड यांनी केली. त्यावरुन काही काळ गोंधळ झाला. या गोंधळातच ग्रामसभा गुंडाळण्यात आली. याचवेळी विविध घोषणा दिल्या जात होत्या. (वार्ताहर)अधिकारी जबाबदार की ग्रामसेवक?‘एखाद्या बारसाठी अधिकारी ग्रामसेवकाच्या घरी जाऊन जबरदस्तीने जबाब घेत असल्यास त्याला ग्रामसेवक बळी पडत असेल तर याबाबत त्या अधिकाऱ्याला दोषी धरायचे की ग्रामसेवकाला?,’ असा प्रश्न शेवाळे व गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हा बार बंद करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.