शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

करून दाखवलं; ग्रेड सेपरेटर खुला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : काम पूर्णत्वास गेलेला ग्रेड सेपरेटर कधी खुला होणार, याची उत्सुकता सातारकरांना लागली असतानाच, खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी ...

सातारा : काम पूर्णत्वास गेलेला ग्रेड सेपरेटर कधी खुला होणार, याची उत्सुकता सातारकरांना लागली असतानाच, खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी सकाळी पाहणीसाठी गेले असता, त्यांनी फीत कापून अचानकपणे उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर खुला झाला असून वचनपूर्ती पूर्ण केली आहे. बोलण्यापेक्षा आम्ही करून दाखवले, असेही यावेळी उदयनराजेंनी जाहीरपणे बोलून दाखविले. सर्वांसाठीच उदयनराजेंचा हा अनपेक्षितपणे धक्का आहे.

वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सेपरेटरच्या उद्घाटनाचीच प्रतीक्षा होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहूर्त मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच पाहणीसाठी गेल्यानंतर फीत कापून ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ग्रेड सेपरेटरमधून वाहनातून प्रवासही केला.

यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील, मिलिंद काकडे, स्नेहा नलवडे, सविता फाळके, सीता हादगे यांच्यासह इतर नगरसेवक व सातारकर नागरिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, ‘साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर महत्त्वपूर्ण होता. यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे. हा ग्रेड सेपरेटर पूर्ण झाल्याने सातारा विकास आघाडीच्यावतीने देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले आहे. या सेपरेटरचे उद्घाटन झाले असून तो सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर करतो. माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरसेवकापासून झाली. पुढे आमदार, मंत्री आणि संत्रीही झालो. त्यानंतर खासदारही झालो. यासाठी सातारकरांनी नेहमीच मला सहकार्य केले.’

चौकट :

मला धक्के देण्याची सवय;

आदत से मजबूर हूॅं...

यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केल्याने राज्यातील नेते नाराज होणार नाहीत का व अचानकपणे उद्घाटन का? असा प्रश्न केला. यावर उदयनराजे म्हणाले, ‘जनता सुखी तर सर्व सुखी. मी फारसा कोणाचा विचार करत नाही. सर्वसामान्यांसाठी सेपरेटर आजच आणि अभी के अभी खुला झाला. मला धक्के देण्याची सवय आहे. कधी मी देतो, तर कधी मला बसतो. आदत से मजबूर हूँ, असेही उदयनराजेंनी बोलून दाखविले.

चौकट :

७५ कोटी रुपये खर्च...

सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणेतीन वर्षांपासून यंत्रणा कामाला लागली होती. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले.

फोटो ०८ग्रेड सेपरेटर...

सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर, निशांत पाटील आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)