कऱ्हाड : शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. एकीकडे संक्रमण वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभाग टप्प्याटप्प्याने लसीचे डोस वाढवीत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाला भक्कम आधार मिळत असून, आजअखेर तालुक्यात ८० हजारांवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी अखेरपासून तालुक्यात रुग्णवाढीला सुरुवात झाली. आजअखेर ती कायम आहे. आणखी काही दिवस कोरोनाची दुसरी लाट सक्रिय राहण्याची शक्यता वर्तविली जात असून, तालुक्यात हजारो रुग्णांची भर पडणार आहे. मात्र, याही परिस्थितीत आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणाचे अचूक नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून हे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या गावांत प्रामुख्याने लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर लसीकरण थंडावले होते. अनेकजण लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते. मात्र, दहा दिवसांपूर्वी पुरेशी लस उपलब्ध झाल्यामुळे मोहिमेला गती आली आहे.
तालुक्यात आजअखेर ८० हजार ६१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कोव्हिशिल्डचे ७५ हजार ६५२, तर कोव्हॅक्सिनचे ४ हजार ४०९ डोस देण्यात आले आहेत. लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य केंद्रांमार्फत गावोगावी जागृतीही करण्यात येत आहे.
- चौकट
कऱ्हाड तालुक्यात...
उपजिल्हा रुग्णालय - १
ग्रामीण रुग्णालय - १
प्राथमिक आरोग्य केंद्रे - ११
आरोग्य उपकेंद्रे - ६४
नागरी आरोग्य केंद्र - १
- चौकट
असे करण्यात आले लसीकरण
लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी : ९११७ : ४७०७
फ्रंटलाईन वर्कर्स : ५४९३ : २२८७
४५ ते ६० वर्षे : २६७३१ : ७११
६० वर्षांपुढील : २९७३३ : १२८२
एकूण लसीकरण : ७१०७४ : ८९८७
- चौकट
लसीकरणाचा लेखाजोखा
नागरी केंद्र : ४७००
हेळगाव : २४४९
इंदोली : ३९१५
काले : ५५२१
कोळे : ३६५९
मसूर : ३६०८
रेठरे : ३२६०
सदाशिवगड : ३७८३
सुपने : ३२६६
उंब्रज : ५११९
वडगाव हवेली : ३४१०
येवती : २४०६
- चौकट
रुग्णालयनिहाय डोस
सह्याद्री : २६०१
गुजर : १५७६
कृष्णा : ७५८०
कऱ्हाड हॉ. : ११८५
शारदा : ३९८९
श्री : ८९५
कोळेकर : ८३७
सिटी : १९८
सिद्धिविनायक : ४१४
फोटो : २२केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक