शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:09 IST

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे ...

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी राहील,’ असे आवाहनसातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले.पाल येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कºहाड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कºहाड उत्तरचे कार्याध्यक्ष महेश जाधव, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये विकासकामे व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. याला कारणीभूत फक्त विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूरला मंत्री चंद्रकांत पाटील टोलमुक्त करत असतील तर साताऱ्याच्या खासदारांनी सातारकरांसाठी टोलमुक्त का नाही केले? जिल्ह्यामध्ये मोठी धरणे असूनही जिल्ह्यातील दुष्काळ त्यांना का हटविता आला नाही. जिल्ह्यात तरुणांची संख्या मोठी आहे. नव्या पिढीला कॉलर उलटी करण्याचा आदर्श देण्यापेक्षा चांगला आर्दश द्या.’चरेगावकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजना विधानसभेच्या पूर्वीच सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.’पावसकर म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. अद्याप ती पूर्ण झाली नाहीत व ती करण्याचाही प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे.’नरेंद्र पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पाली या गावामध्ये नरेंद्र पाटील यांची रॅली काढण्यात आली. रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, विश्वासराव काळभोर, कºहाड उत्तरचे भाजपाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सयाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, अ‍ॅड. विशाल शेजवळ, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, सुनील पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, विश्वासराव काळभोर, संतोष पाटील, सयाजीराव पाटील-कोर्टी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक