शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जनता मागते एक पूल... नेते देतात दोन पूल!

By admin | Updated: August 27, 2014 23:31 IST

संगमनगर धक्का : उपमुख्यमंत्र्यांनंतर आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

पाटण : पाटण तालुक्यातील बहुचर्चेतील संगमनगर धक्का पुलाचा नवीन पूल आमच्यामुळेच मंजूर झाला, हा श्रेयवाद निर्माण झाला आहे. उपमुख्यंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर मंगळवार, दि. २६ रोजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर मणेरी गौंड येथे दुसऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ ही म्हण शाळेत सर्वचजण शिकलो आहोत. पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील संगमनगर धक्का पुलाकडील ३५ गावांतील ग्रामस्थांना काहीसा असाच अनुभव येत आहे. पाटणकर गट व मुख्यमंत्री गट यांच्यातील लढाई ३५ गावांना चांगलाच माहीत आहे. मात्र, यातून येतील लोकांचा चांगलाच फायदा होणार आहे.कोयना धरणातून पावसाळ्यात पाणी सोडल्यानंतर संगमनगर धक्का पूल हमखास पाण्याखाली जातो. त्यामुळे पुलापलीकडील ३५ गावे संपर्कहीन होतात. ३५ गावांची वाताहत अनेक वर्षांपासून सुरू आहे. पाटणकर २५ वर्षे, तर शंभूराज देसाई पाच वर्षे आमदार होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील हे तत्कालीन खासदार होते. ही सर्व मंडळी पाटण तालुक्यातील, त्यांनी संगमनगर धक्का पुलासाठी प्रयत्नही केले. मात्र, ते आजअखेर अर्ध्यावरच राहिले. संगमनगरचा नवीन पूल बांधणे हे तसे मोठे आव्हानच वाटू लागले होते. कालांतराने संगमनगर पूल ही ऐवढी किरकोळ बनली. त्यास दोन्ही काँग्रेसमधील श्रेयवादच कारणीभूत ठरला आहे. श्रेयवादात दोन्ही बाजूंकडून चक्क नेत्यांनीच उडी घेतल्याने हे शक्य झाले. बघता-बघता एक नव्हे दोन पूल होणार हे निश्चित झाले. आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी नेहमीच्या रणनीतीप्रमाणे अजित पवार यांना आणून भूमिपूजन उरकले. केवळ उद्घाटन करून चालणार नाही. हा पुल अस्तित्वात येण्यास आणखी किती दिवस वाट पाहावे लागणार आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)