सातारा : सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयापुढे तुंबलेल्या गटरात चक्क पेन, पट्टी, पेन्सिल आणि भरपूर प्लास्टिकचे कागद सापडले. दोन दिवसांपासून येथे दुर्गंधी पसरली होती.गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालय परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरात विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य मिळण्याची दुकाने आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या परिसरात राबता आहे.महाविद्यालयासमोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण पाणी साठून राहिले होते. दोन दिवस या पाण्याचा निचरा झाला नसल्यामुळे त्यावर थरही साठला होता. याविषयी संबंधित विभागाला स्थानिकांनी कळविल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत या गटारातील गाळ काढला. त्यामधून मोेठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे साहित्य मिळाले. त्याबरोबरच प्लास्टिकच्या पिशव्याही आढळून आल्या आहेत. (प्रतिनिधी)
पेन, पट्टी अन् प्लास्टिक...!
By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST