शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचा चेंडू सहकारमंत्र्यांच्या कोर्टात!

By admin | Updated: April 12, 2016 00:45 IST

आज मुंबईत बैठक : गोरे अन् इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार

दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संचालक आमदार जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष थेट विधीमंडळ अधिवेशनात पोहोचला आहे. आ. गोरे यांनी अधिवेशनातच बँकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून सहकारमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलवावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून मंगळवारी मुंबई येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवड होताच बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या सभांच्या नोटीस तसेच इतिवृत्ताबाबत, कर्जप्रकरणांच्या मंजुरीपर्यंतच्या वादग्रस्त मुद्द्यांना हात घालत त्यांनी बँकेच्या गैरकारभाराविरोधात जिल्ह्यात उपोषणही केले.नियमबाह्य मुदतवाढ देऊन बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संचालक मंडळ पाठीशी घालत असल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला होता. संचालक मंडळाच्या बैठकांना शासनाचा प्रतिनिधी उपस्थित रहात नसल्याची तक्रारही त्यांनी अधिवेशनात केली होती. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शेतकऱ्यांच्या सवलतीच्या दरातील कर्जवाटपाच्या प्रश्नावरूनही बँक आणि आ. गोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. नाबार्डच्या परिपत्रकाचा गैरअर्थ काढून संचालक मंडळ शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप गोरे करत आहेत, तर बँकेकडून नाबार्डच्या सूचनांप्रमाणे कर्जवाटप करत असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्कंठाआ. गोरे यांनी लागवडीपूर्वीच पाीकपाहणी करून सवलतीच्या दरातील कर्जवाटप कसे करणार, असा प्रश्न थेट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच विचारला होता. जिल्हा बँकेतील संचालकांचा मनमानी कारभाराबाबत मुंबईत बैठक बोलाविण्याचीही मागणी आ. गोरे यांनी केली होती. मंगळवार, दि. १२ रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली. हजारो शेतकरी सभासद असलेल्या सातारा जिल्हा बँकेचा पीकपाहणी करून सवलतीच्या दरातील कर्जवाटप हा मुद्दा जिल्हाभर चांगलाच चर्चेत आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा निघणार, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्कंठा आहे.