शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पवार-शिंदेंमध्येच पारंपरिक लढत!

By admin | Updated: January 9, 2017 22:30 IST

जावळी तालुका : राष्ट्रवादीकडे इच्छुक वाढले; भाजप-शिवसेनाही सक्रिय

आनंद गाडगीळ ल्ल मेढाजावळी तालुक्यातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ गटात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असून, विद्यमान सदस्य दीपक पवार पुन्हा रिंगणात उतरणार काय? याबरोबरच पवार-शिंदे पारंपरिक लढत होणार की काय? या चर्चेबरोबरच अन्य कोणी लढणार का ? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. प्रतापगड कारखान्याचे सौरभ शिंदे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून असलेल्या इच्छुक उमेदवारात आघाडीवर आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून, राष्ट्रवादीतील गटही सक्रिय झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपा बरोबरच शिवसेनाही कुडाळ गटात सक्रिय झाली असून, शिवसेनेचा उमेदवारही रिंगणात उतरणार काय?, अशीही मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यातील कुसुंबी, म्हसवे व कुडाळ गटापैकी कुडाळ गट हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. सध्या भाजपाचे दीपक पवार यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आहे. गतवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सौरभ शिंदे यांचा पराभव करून हा गट ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तालुक्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या गटावर प्रभाव असला तरीही या गटात दीपक पवारांच्या नेतृत्वाखालील भाजपा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत तरडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही तितकीच सक्रिय आहे. राष्ट्रीय काँग्रेस व मनसे देखील थोड्या फार प्रमाणात अस्तित्व ठेवून आहे. कुडाळ गट सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षित असल्याने विद्यमान सदस्य दीपक पवार पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी दिवंगत लालसिंगराव शिंदे यांचे नातू सौरभ शिंदे हे देखील मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीत गटतट असले तरीही राष्ट्रवादीची ताकद या गटात नक्कीच जास्त आहे. मात्र, ही ताकद मतभेद विसरून गटतट एकत्र झाले तरच दिसणार हे देखील तितकेच खरे आहे. राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते हे कुडाळ भागातील असून, यामध्ये सुनेत्राताई शिंदे, वसंतराव मानकुमरे, सुहास गिरी, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, हृषीकांत शिंदे असे मातब्बर नेते आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार असल्याने दीपक पवार यांना तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राष्ट्रवादीमध्ये शिंदे यांच्या बरोबरच आणखीही इच्छुक आहेत. कुडाळ आणि शिंदे घराणे यांचे एक वेगळेच नाते आहे. दीपक पवार आणि शिंदे घराणे यांची पारंपरिक लढत जावळीकरांनी अनेकदा अनुभवली आहे. दोन तुल्यबळ असलेल्या घराण्यातील ही लढाई पारंपरिक स्वरूपाची असल्याने यावेळी देखील ही लढत पारंपरिक होणार की अन्य उमेदवारांमध्ये लढत होणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या माध्यमातून व कायम जनतेच्या संपर्कात राहून शासनाकडून विविध विकासकामे करण्यावर दिलेला भर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायम विरोधात घेतलेली कणखर भूमिका या दीपक पवारांच्या जमेच्या बाजू आहेत. युवक वर्गात वेगळी छाप पाडणारा प्रतापगडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संपर्कात असणे या सौरभ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत.निवडणुकीसाठी कुडाळ गटात शिवसेना देखील सक्रिय असून राष्ट्रवादी, भाजपाच्या बरोबरीने ताकद निर्माण करण्यासाठी सेनेचे प्रशांत तरडेंसह आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू हृषीकांत शिंदे हे देखील जावळीच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे. निवडणूक आव्हानात्मक ठरणार... एकंदरीत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुडाळ गटातील लढत ही नक्कीच चुरशीची व रंगतदार होणार हे जरी स्पष्ट असले तरीही दीपक पवार, सौरभ शिंदे यांच्यात ही लढत होणार की भावी राजकीय गणिते मांडून आणखी नव्या चेहऱ्यांना संधी देणार? हे सध्या तरी अनुत्तरीतच आहे. असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वांनाच या गटातील निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार यात शंकाच नाही.