शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की टॉवरनजीकच्या रहिवाशांचा जीव मुठीत

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

पाटण तालुक्यातील स्थिती : कंपन्यांच्या स्पर्धेमुळे टॉवरचे काम निकृष्ट; प्रशासनाचे दुर्लक्ष

पाटण : वीजनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पाटण तालुक्यात गेल्या काही वर्षांत पवनचक्कीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती झाली. तालुक्यातील प्रत्येक डोंगरपठार पवनचक्कीने वेढला आहे. शेकडो पवनचक्की कंपन्यांनी टॉवर उभारण्याच्या स्पर्धा सुरू केल्या आहेत. या स्पर्धेत टॉवरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, पवनचक्क्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कंपन्यांना टॉवर कोसळण्याचे नुकसान नगण्य असले तरी टॉवरच्या आसपास असणाऱ्या गावांना, घरांना, शेतीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील लोक जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारापासून सुरू झालेली पवनचक्की वाल्मिकी पठार, सडावाघापूर पठार, पांढरेपाणी, काहीर या सर्वच पठारावर पसरलेली आहे. येथे एक ना अनेक कंपन्या पवनचक्की उभारण्यास कार्यरत आहेत. या सर्वच कंपन्यामध्ये टॉवर उभारणीच्या कामात स्पर्धा निर्माण झाली असून, ते काम वेगात सुरू आहे. मात्र, ते लोकांच्या जीवावर बेतण्याच्या अवस्थेत आहे. कारण अनेक ठिकाणच्या पवनचक्क्या कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणच्या पवनचक्क्या अर्धवट अवस्थेत कोसळलेल्या आहेत. त्यामुळे निकृष्ट कामाचा दर्जा येथे पाहावयास मिळत आहे. हजारो टन वजन क्षमतेच्या पवनचक्की टॉवरसाठी तेथील जमिनीतील पाया भक्कम असण्याची गरज असताना व त्या टॉवरची बांधणी हवामान गृहित धरून करणे गरजेचे असताना केवळ स्पर्धेतून दर्जाहीन बांधकाम येथे झाल्याचे दिसून येत आहे. काही पवनचक्क्या पात्यापासून तुटून पडल्या आहेत. तर काही पवनचक्क्या जमिनीतील पायापासूनच उन्मळून पडत असल्याचे समोर येत आहे.आतापर्यंत पांढरेपाणी, वनकुसवडे, सडावाघापूर, वाल्मिकी आदी पठारावर पवनचक्क्या कोसळल्या आहेत. तर काही पवनचक्क्या पडण्याच्या मार्गावर आहेत. काही पवनचक्क्यांच्या पायथ्याजवळ सध्या डबल स्पेचिंंगचे काम सुरू आहे. (वार्ताहर)