शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना प्यावं लागतंय विकतचं पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 13:12 IST

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. यंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट झाला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विकतचं पाणी आणून प्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच आजारपणाने पिचलेले रुग्ण आर्थिक कोंडीत सापडत आहेत.

ठळक मुद्देसाताराजिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकारएक दिवसाआड पाणी येत असल्यामुळे रुग्णांचे हालयंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाटवॉर्डामध्ये पाण्याची सोय झाल्यास पाण्यासाठी पैसे खर्च होणार नाहीत

सातारा, दि. 26 : जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. यंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट झाला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विकतचं पाणी आणून प्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच आजारपणाने पिचलेले रुग्ण आर्थिक कोंडीत सापडत आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या इतर चांगल्या सुविधा रुग्णांना मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले पाणी मात्र रुग्णांना मिळत नाही. या शासकीय रुग्णालयाला जीवन प्राधिकरण आणि कास तलावातून पाणीपुरवठा केला जातो.

सिव्हिलमध्ये पाणी साठविण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या आहेत. एका टाकीमध्ये सतत पाणी उपलब्ध असते. मात्र, हे पाणी डायलेसीस विभागाला अत्यंत गरजेचे असते. उलट आहे तेच पाणी डायलेसीस विभागाला पूरत नाही. रोज सरासरी दहा हजार लिटर पाणी डायलेसीस विभागाला लागते. त्यामुळे येथील कर्मचारी पाणीसाठा करून ठेवतात. जर पाणी नसेल तर डायलेसीस रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. या विभागालाही पाण्याची कमतरता पडू देऊ नये, अशी अपेक्षा असते. 

वॉर्डामध्येही याहून परिस्थिती वेगळी नाही. साधारण एका वॉर्डामध्ये तीस रुग्ण असतात. त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक म्हणजे जवळपास साठजण एका वॉर्डामध्ये असतात. तसेच वॉर्डातील कर्मचारी त्यांच्यासोबतीला असतात. या सर्वांना पाण्यासाठी सध्या भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागतंय. यंदा मात्र पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये पाण्याचा अक्षरश: ठणठणाट आहे.

वॉर्डामधील प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकाला पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. ज्यांची परिस्थिती आहे ते नातेवाईक वीस रुपयांची पाण्याची बाटली आणत आहेत. मात्र, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांनी पाणी कोठून आणावे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाइकाने चक्क शौचालयाला वापरतात ते पाणी बाटलीमध्ये भरून आणले.

हा प्रकार एका वॉर्डातील नर्सच्या निदर्शनास आल्यानंतर तिने त्याला थेट वरच्या डॉक्टरकडे जावा आणि त्यांना सांगा आम्ही कसले पाणी पितोय ते, म्हणजे त्यांना समजेल. हा सल्ला ऐकून मात्र संबंधित रुग्णाचा नातेवाईक मान खाली घातला. रुग्णांचे होत असलेले हाल रुग्णालयातील कर्मचाºयांनाही पाहावत नाहीत; पण त्यांचा नाईलाज होत आहे.

एक आठवडा झाला आम्ही सिव्हिलमध्ये आहोत. रोज बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. वॉर्डामध्ये पाण्याची सोय झाल्यास पाण्यासाठी पैसे खर्च होणार नाहीत.- नारायण साळुंखे, सातारा, रुग्णाचे नातेवाईक