शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पेशंट अ‍ॅडमिट आहे... घरात लग्न ठरलंय!

By admin | Updated: November 2, 2015 23:58 IST

तीन महिने ‘फूटबॉल’ : जिजामाता बँकेच्या खातेदारांनी उपनिबंधकांपुढे मांडल्या व्यथा; सहकारमंत्र्यांच्या बैठकीनंतरच दिलासा शक्य

सातारा : कुणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, तर कुणाच्या घरातला पेशंट अ‍ॅडमिट आहे. कुणाला पेन्शन स्कीममधले दरमहा मिळणारे पैसे बंद झाल्यामुळं औषधाचे वांदे झाले आहेत, तर कुणी मुलाच्या उच्च शिक्षणासाठी साठवून ठेवलेली पुंजी अडकून पडलीय.जिजामाता महिला सहकारी बँकेत ठेव ठेवलेल्या प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेच आणि वेळेवर पैसे मिळत नाहीत म्हणून जो-तो कातावलाय. बँकेत ‘तीच ती’ उत्तरं मिळत असल्यामुळे खातेदारांनी सोमवारी बँकेतून थेट सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि आपल्या अडीअडचणी त्यांच्या कानावर घालून एकच सवाल विचारला... ‘अजून किती दिवस?’गेले तीन महिने आमचा अक्षरश: ‘फूटबॉल’ झालाय, असं सांगत हे खातेदार उपनिबंधक महेश कदम यांच्या कार्यालयात दाखल झाले. प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावरच जिजामाता बँकेबद्दल एक फलक लावला असून, कऱ्हाड अर्बन बँकेत ही बँक विलीन होण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा मजकूर या फलकावर मोठ्ठ्या अक्षरात लिहिण्यात आला आहे. परंतु खातेदारांनी चार जिने चढून वर येऊ नये एवढाच या फलकाचा उद्देश असावा काय, असा संभ्रम पडतो. कारण ‘सक्तीच्या विलीनीकरणास रिझर्व्ह बँक परवानगी देत नाही. विलीनीकरणास तयार असलेली बँक जिजामाता बँकेची आर्थिक स्थिती पाहिल्याखेरीज निर्णय घेणार नाही. आॅडिट पूर्ण झाल्याशिवाय आर्थिक स्थिती कळणार नाही आणि आॅडिट कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही,’ अशी चार उत्तरे दस्तुरखुद्द उपनिबंधकच देत आहेत. सामान्य खातेदारांना तातडीचा दिलासा मिळणं अवघड आहे, असाच त्यांच्या सांगण्याचा एकंदर अर्थ.एका सेवानिवृत्ताने फंडाची रक्कम ‘जिजामाता’ मध्ये ठेवलीय. ‘मंथली इन्कम स्कीम’अंतर्गत त्याला पेन्शनप्रमाणे दरमहा रक्कम मिळत असे. मात्र आता ती मिळत नाही. असे अनेक वयोवृद्ध असून, ते सोमवारी बँकेत हजर होते. काही सेवानिवृत्तांचं या तीन महिन्यांच्या कालावधीत निधन झालंय, असंही ते सांगत होते. एका व्यक्तीच्या जावयाने जागाखरेदीचा व्यवहार केला. त्याला तातडीनं रक्कम हवी होती. पण बँकेच्या घोळामुळं ती मिळाली नाही आणि त्याने येरवडा येथे आत्महत्या केली, असं त्याचे सासरे सांगत होते. बँकेची हिशेबपुस्तकं तपासून झाल्याखेरीज काहीच होणार नाही; मात्र तातडीचा दिलासा म्हणून अत्यंत नड असलेल्यांची प्रकरणे रिझर्व्ह बँकेकडे पाठवली जात आहेत, अशी माहिती उपनिबंधकांनी दिली. मात्र, यातली किती मंजूर झाली, याचा फलकही बँकेत लिहिलेला नाही, ही खातेदारांची तक्रार आहे. (प्रतिनिधी) ‘टॅफकब’चा निर्णयही अद्याप नाहीच‘टास्क फोर्स फॉर को-आॅपरेटिव्ह अर्बन बँक्स’ अर्थात ‘टॅफकब’ आर्थिक स्थिती बघून एखादी बँक अवसायनात (दिवाळखोरीत) काढू शकते. बँकेचे विभागीय संचालक या टास्क फोर्सचे संचालक असतात तर सहकार आयुक्त हे सहसंचालक असतात. ठराविक कालावधीने त्यांच्या बैठका होतात आणि त्यात असे अनेक विषय हाताळण्यात येतात. या टास्क फोर्सचा ‘जिजामाता’बद्दल अद्याप निर्णय नाही.आॅडिटर्सना पूर्ण दफ्तर दिलेच नाही!जिजामाता बँकेच्या हिशेबवह्यांमध्ये आठ नोंदी संशयास्पद आढळल्या असल्या तरी हे हिमनगाचे केवळ टोक असू शकते, असं उपनिबंधकांचं मत आहे. बँकेविरुद्ध दिलेल्या तक्रारीत तक्रारदाराने या आठ नोंदींचा समावेश केलेला असला तरी अशा अनेक नोंदी असू शकतात. त्यामुळे प्रत्येक चलन, प्रत्येक व्हाउचर, प्रत्येक नोंद व्यवस्थित तपासली जातआहे. ही प्रक्रिया अर्थातच प्रदीर्घ आहे. हिशोबतपासणीसाठी ३१ आॅक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु बँकेच्या संचालक मंडळाने अद्याप पूर्ण दफ्तरच ताब्यात दिलेलं नाही, असा गौप्यस्फोट उपनिबंधकांनी खातेदारांशी बोलताना सोमवारी केला. ‘त्या’ प्रकरणांचा प्रवासआत्यंतिक गरज असलेल्यांच्या ठेवी तातडीने परत देण्यात याव्यात, अशी मागणी करणारी शंभर प्रकरणे रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आली. रिझर्व्ह बँकेने ती निर्णयाविना परत पाठविल्यानंतर त्यातील अधिक गरज असणाऱ्यांची ५० प्रकरणे रिझर्व्ह बँकेकडे गेली.रिझर्व्ह बँकेने त्यातील २४ खातेदारांची प्रकरणे मंजूर करून पाठविली आहेत. मात्र, ठेव परत करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू नाही. गरज लक्षात घेऊन पाठविलेली शंभरातील ७६ प्रकरणे अजून टांगत्या अवस्थेत असताना उर्वरित ठेवीदारांचे काय, हा प्रश्नच आहे.दोन नोव्हेंबरनंतर जिजामाता बँकेच्या प्रकरणात लक्ष घालून बैठक घेण्याचे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर बँकेच्या भवितव्याबाबत किमान दिशा निश्चित होईल. - महेश कदम, उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा